ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोयना प्रकल्पांतर्गत पर्यटन विकासाची कामे तातडीने पूर्ण करा -राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

September 5, 202212:52 PM 8 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) – कोयना जलाशयातील पाण्याचे श्री  देसाई यांच्या हस्ते पूजन कोयना प्रकल्पांतर्गत मंजूर पर्यटन विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी  दिल्या.

कोयनानगर येथील चेंमरी विश्रामगृहात कोयना प्रकल्पाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.  बैठकीस सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे,  जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ती नलवडे, तसेच जलसंपदा, महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी  देसाई यांनी कोयना प्रकल्पातील कामांमधील अडीअडचणींचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने प्रकल्पास उपलब्ध असणारा तुटपुंजा निधी, तांत्रिक-अतांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता, तसेच शासन स्तरावरील प्रलंबित असणारे कोयना जलाशयातील बोटिंगसाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सुधारणा करणे, नवजा रस्ता हस्तांतरण इत्यादी बाबींचा आढावा घेतला. या प्रकरणांच्या निपटारा करण्यासाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनींचे वाटप करणे व नागरी सुविधा देणे विषयक कामांचाही आढावा घेऊन सदर कामांना गती देणेबाबत निर्देश राज्य उत्पादन शुल्कमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

प्रारंभी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना जलाशयातील पाण्याचे पूजन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *