नवी मुंबई: करोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे नशेचे पदार्थ मिळेनासे झाले आहेत. त्यातच मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. मात्र, नशेची तलफ शमवण्यासाठी खोकल्याच्या औषधचा वापर वाढला असून या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सनउल्ल हबीबउल्ला खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थविरोधी पथकाचे हवालदार संजय चौधरी यांना नशेसाठी खोकल्याच्या औषधाचा साठा करणाऱ्या खानविषयी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक जयराज छापरिया यांच्या मार्गदर्शखाली सापळा रचून आरोपीस जुहूगाव येथे अटक करण्यात आली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील पिशवीत सुमारे १२ हजार रुपयांच्या तब्बल ९५ खोकल्याचे औषधच्या बाटल्या आढळून आल्या. हे खोकल्याचे औषध डॉक्टरांनी सुचविले तरच दिले जाते. त्यामुळे खान याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा कुठून आला याचाही तपास पोलीस करीत आहेत.
Leave a Reply