ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विकेल ते पिकेल अभियान: शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी स्टॉल उभारणीचे नियोजन करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

March 23, 202214:59 PM 42 0 0

जालना :  शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या मालाला हमखास भाव मिळून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्यासाठी विकेल ते पिकेल अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी तालुका, जिल्हास्तरावर ठिकाणांची निश्चिती करण्याबरोबरच शासकीय कार्यालयांच्या मोकळया जागांमध्ये शेतकऱ्यांना स्टॉल उभारणीचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
आत्मा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, आत्माच्या प्रकल्प संचालक श्रीमती शितल माकर-चव्हाण, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, एस.एन. आदमाने, उद्धवराव खेडेकर, अतुल लड्डा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडण्यासाठी जगभरात विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे. त्याचबरोबर आत्मामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला, त्यांच्या उत्पन्नामध्ये किती भर पडली याची माहिती संकलित करण्यात यावी. यशस्वी शेतकऱ्यांची माहिती जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवुन त्यांचेही उत्पन्न वाढेल यादृष्टीने काम करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी प्रकल्प संचालक श्रीमती शितल माकर-चव्हाण यांनी आत्मामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सभागृहाला दिली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *