जालना (प्रतिनिधी) : राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना येथे मिशन युवा स्वास्थ अंतर्गत कोविड-19 लसिकरणाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नारायणराव मुंढे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा तिड़के यांची प्रमुख उपस्थिती होती. लसिकरण शिबिराला जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने पुजा गेडाम, सुनिल घनसावंत, डॉ. शिवाजी आसाबे, अर्चना घोटकर, ज्योती कुलकर्णी, भाले आदींची उपस्थिती होती. सदर लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविदयालय यांच्या संयुक्त विदयमाने करण्यात आले.
शिबिर उद्घाटन प्रास्ताविक प्रसंगी प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके यांनी कोविड-19 चे भिषण वास्तव कथन केले. हे सर्व आपण अनुभवलेच आहे. यावेळी आपले आत्मजन सहकारी आणि कोरोना योद्धे आपण गमावले आहेत. अशा बिकट प्रसंगी सर्व जग थांबले होते शिक्षण क्षेत्र सुध्दा त्याला अपवाद नाही. कोरोना महामारीच्या काळात मदत करायला फक्त डॉक्टर, अरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आशा वर्कर्स हे देतदूता प्रमाणे समाजाच्या कामी आले त्याबददल समाजाच्या वतीने त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे उदघाटक मा. आ. डॉ. नारायणराव मुंढे यांनी केला ते असे म्हणाले की, व्यक्तींच्या जन्मापासून ते मरणापर्यंत डॉक्टर है देवदूताप्रमाणे आपल्या सोबत असतात त्यांची प्रतिमा फार मोठी आहे. डॉक्टरच्या पवित्र कार्याबददल सर्वांनी कृतज्ञ राहिले पाहिजे असे त्यांनी अवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचल रा. से. यो कार्यक्रमाधिकारी प्रा. भिमराव वाघ तर आभार प्रदर्शन रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आलिया कौसर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा. से. यो जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. सोमीनाथ खाडे आणि रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. विठ्ठल गाडेकर यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास महाविदयालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी आणि विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत महाविदयालयातील विदयार्थ्याना कोविडचे लसिकरण करण्यात आले. दिवसभर लसिकरण करण्यात आले.
Leave a Reply