ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पनवेल महापालिका क्षेत्रात १५ ते १८ वयाच्या मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू

January 7, 202213:05 PM 39 0 0

पनवेल – (छाया म्हात्रे) : कोरोना पाठोपाठ ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या आदेशाने सोमवार पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेने आठ दिवसांत मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याची मोहीम हाती घेतली आहे आणि ती यशस्वी करण्यासाठी थेट शाळांमध्येच लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पनवेल मधील मुलींच्या के. व्ही. कन्या शाळेतून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे.

पनवेलचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या संकल्पनेतून महापालिका क्षेत्रातील दहा शाळांमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. एक जानेवारीला आयुक्तांनी महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून लसीकरण सुरू करण्यासंदर्भात आवाहन केले होते. यामध्ये ११० शाळांनी सहभाग घेतला आहे. महापालिका क्षेत्रात १५ ते १८ वयोगटातील ४० हजार मुले असण्याचा अंदाज आहे. महापालिकेने या सर्वांपर्यंत लस पोहोचण्यासाठी थेट शाळेमध्ये लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० पथके तयार करून १० शाळांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
आयुक्त गणेश देशमुख व महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत के. व्ही. कन्या शाळेतून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. दररोज पाच हजार विद्यार्थ्यांना लस देऊन आठ दिवसात ४० हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य असून पालिका प्रशासन ते सहजपणे पूर्ण करेल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेकडे पुरेशी लस उपलब्ध आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने करण्यात येणार आहे. पहिल्या एक तासात एका केंद्रावर ९० मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे लसीकरण अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होईल असेही ते म्हणाले. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, उपायुक्त सचिन पवार, मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. भक्तराज भोईटे आदिंसह के.व्हि. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक उपस्थित होते. ही लसीकरणाची मोहीम यशस्वी होईल आणि कोरोनाचे सावट लवकरच दूर होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *