उरण ( संगिता पवार ) उरण तालुक्यातील नवघर येथे रविवार (दि. २६ )रोजी *ए.पी.एम टर्मिनल कंपनी नवघर* यांच्या वतीने कोवीड-१९ प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे नवघर व नवघर परिसरातील नागरिकांना पालवी हाॅस्पीटल उरण यांच्या मार्फत . शेखर प्रकाश तांडेल नवघर यांच्या कार्यालयात मोफत देण्यात आले.
या प्रसंगी ए.पी.एम टर्मिनल कंपनीचे मॅनेजमेंट व पालवी हाॅस्पीटल उरणचे डाॅ.श्री.सुरेश पाटील आणि त्यांची टीम तसेच नवघर गावातील ए.पी.एम.टर्मिनलचे कर्मचारी राजेश श्रीराम पाटील, .जयप्रकास नारायण पाटील, .धमेंद्र भालचंद्र तांडेल,कु.प्रितम कृष्णा बंडा,श्री.विनोद सदानंद बंडा, .दिनेश वसंत बंडा, चंद्रलाल तांडेल , .वैभव मधुकर भोईर अमित जोशी,कु.हार्दिक हसुराम भोईर,कु.रोशन सदानंद भोईर इत्यादी तरूणांनी योग्य प्रकारे नियोजन करून ३५० नागरिकांना पहिला व दुसरा लसीचा डोस देण्यास सहकार्य केले
Leave a Reply