ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निरोगी पशुसंवर्धनासाठी लसिकरण महत्वाचे – पुजा खरात

September 2, 202113:44 PM 8 0 0

जालना (प्रतिनिधी) ः शेतकर्‍यांसाठी जोडधंदा म्हणून पशुसंवर्धनाला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे निरोगी आणि चांगले पशुधन हवे असेल तर आपल्याला त्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्यांची नियमीत देखभाल आणि लसिकरण करुन घेणे अत्यंत महत्वाचे आणि उपयुक्त असल्याचे मत पुजा खरात यांनी व्यक्त केले.


महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची, कराड, जि. सातारा येथील विद्यार्थीनी पुजा दत्ता खरात या एका कार्यशाळेत बोलत होत्या. गुरुगणेश गोसंवर्धन प्रकल्प, राममुर्ती येथे ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी पुजा खरात यांनी पशुसंवर्धनासाठी गायी, म्हसी, शेळ्या यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच निरोगी राहण्यासाठी लसिकरण किती महत्वाचे आहे व कोण कोणत्या लसी द्याव्यात याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. शिंदे, प्रा. माने, प्रा. भुतकर, प्रा. बागल यांचे मार्गदर्शन लाभले तर पशु चित्सिक अभय सराटे, गणेश जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *