उरण ( संगिता पवार ) : कोकण ज्ञानपीठउरण वाणिज्य व कला महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत महाविद्यालयीन विदयार्थ्याचे शुक्रवार ( दि .२९ ) रोजी लसिकरण करण्यात आले.७५ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन रमेश ठाकूर ( सदस्य महाविद्यालय विकास समिती) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. जी. के. देसाई (वैदयकिय अधिक्षक, इंदिरा गांधी ग्रामीन रूग्णालय उरण ) यांनी कोव्हीड- १९ लसिकरण विषयी जनजागृती करून लसिकरणा विषयीचे . महत्व सांगितले . या प्रसंगी . हेमा म्हात्रे (आदिपरिचारिका), . प्राची ठाकूर (परिचारिका), विलासिनी बोरवेकर (परिचारिका) यांनी विदयार्थ्यांचे लसिकरण केले. या कार्यक्रमात यशस्वीतेसाठी एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. डी. पी. हिंगमिरे, तानाजी घ्यार, श्री. निकेतन साई कदम, श्री. रॉबिन म्हात्रे, आदित्य शिंदे व राष्ट्रीय सेवा श्री. योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा सर यांनी प्रत्येक विदयार्थ्याचे लसीकरण करणे व भारत कोव्हिड मुक्त करणे हे आपले ध्येय असल्याचे यावेळी सांगितले.
Leave a Reply