ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वामनदादा कर्डक यांच्या गाण्यांनी आंबेडकरी चळवळीला चालना मिळाली – सुभाष लोखंडे

August 17, 202114:45 PM 18 0 0

नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरच्या काळात महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या काव्यातून आंबेडकरी विचारांचे क्रांती सौंदर्य अधोरेखित केले. अनेक गायकांनी वामनदादांची गाणी गायली. वामनदादांची गाणी गात आणि त्यांच्या प्रेरणेतून आपल्या काही रचना घेऊन कित्येक गायक, शाहीर चळवळीत उतरले. वामनदादांच्या गाण्यांनी आंबेडकरी चळवळीला चालना मिळाली असे मत येथील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे यांनी येथे व्यक्त केले. महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती प्रज्ञा करुणा विहार येथे साजरी करण्यात आली. यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला साहेबराव थोरात, महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक अंकुश चित्ते तसेच महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक क्रांतीकुमार पंडित, साहित्यिक गंगाधर ढवळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष संजय कदम, ग्रंथ वाचक राहुल कोकरे, भगवान येवले, सतीश कांबळे, अॅड. अनिल सदावर्ते, नंदू खाडे, लखन नरवाडे यांची उपस्थिती होती.

आंबेडकरी चळवळीत आपल्या काव्याया माध्यमातून गीतक्रांती घडवून आणणाऱ्या वामनदादा कर्डक या महाकवीची जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ (ता. १५) झाला. याची सुरुवात नांदेडला देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा विहारातून झाली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर जयंतीनिमित्त वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रतिमांच्या दीपपूजनानंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक अंकुश चित्ते आणि क्रांतीकुमार पंडित यांनी वामनदादांची निवडक गाणी गायली. यावेळी पुढे बोलताना लोखंडे म्हणाले की, आंबेडकरी चळवळीत गीतगायन तथा प्रबोधनाला फार महत्त्व आहे. जुन्या पिढीतील गायकांनी पायी फिरून गावोगावी गाण्यांच्या माध्यमातून घरोघरी बाबासाहेबांचा क्रांतीकारी विचार नेला. या काळातील कवी, गायक, भीमशाहिरांनी जलशांच्या, गीत गायन मंचाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली. जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठिकठिकाणी वर्षभर अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शकुंतलाबाई सोनुले, शोभाबाई गोडबोले, लक्ष्मीबाई खाडे, निर्मलाबाई पंडित, गिताबाई दिपके, चौत्राबाई चींतूरे, सुमनबाई वाघमारे, आशाबाई हटकर, भिमाबाई हटकर, गोदावरीबाई लांडगे, निलाबाई हटकर, जिजाबाई खाडे, महामाया येवले, ललिताबाई कोकरे, गिरजाबाई हिंगोले, नानाबाई निखाते, भागीरथाबाई थोरात, गयाबाई नरवाडे, शोभाबाई पंडित, गुजाबाई खाडे, कांताबाई लोणी, छायाबाई थोरात यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील महिला पुरुष बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *