ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भिक्खू संघास चिवरदान सामाजिक कार्यकर्ते रमेशभाऊ गोडबोले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

June 12, 202112:40 PM 43 0 0

नांदेड – येथील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रमेशभाऊ गोडबोले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. संध्याछाया वृद्धाश्रमात तसेच नेरली कुष्ठधाम येथे अन्नदान व खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भिक्खू संघास चिवरदान तसेच वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेशदादा सोनाळे, प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो, नगरसेविका ज्योत्स्ना गोडबोले, कौशल्या गोडबोले, दैवशाला गोडबोले, ज्योती गोडबोले, आशाताई गोडबोले, सुरेश हटकर, प्रा. सतीश वागरे, धम्मसेवक गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे, संजय कवठेकर, प्रकाश दिपके, संतोष नरवाडे, स्वप्नील निखाते, गौतम येवले, माधव गायकवाड, जयवंत लांडगे, अक्षय पंडित, अक्षय नरवाडे, तथागत ढेपे, राजू गोडबोले, राजू गच्चे, विनोद खाडे, किरण पंडित यांच्यासह भिक्खू संघाची उपस्थिती होती.

सामाजिक कार्यकर्ते रमेशभाऊ गोडबोले मित्रमंडळाने वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले. प्रथम संध्याछाया वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृध्दांना भोजन दिले तसेच नेरली कुष्ठधाम येथेही भोजनदान कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भिक्खू संघास रमेशभाऊ यांच्या परिवाराकडून चिवरदान करण्यात आले. वाढदिवसानिमित्त केंद्राच्या पार्किंग परिसरात बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. त्यानंतर वनभोजनाचा हृद्य कार्यक्रमही घेण्यात आला. तसेच तेथे सुरू असलेल्या बांधकामासाठी दहा हजार रुपयांचे आर्थिक दानही श्रामणेर प्रशिक्षण केंद्राकडे सोपविण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी रमेशभाऊचे अभिष्टचिंतन केले. भिक्खू संघाच्या आशिर्वाद गाथेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. दिवसभरात झालेल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तन्वी गोडबोले, रोहन गोडबोले, ऋत्विक गोडबोले, खुशी गोडबोले, रोहीत गोडबोले, मोहित गोडबोले, पंकज पाईकराव, गोपीनाथ खाडे, प्रेमानंद हिंगोले, महेंद्र नरवाडे, दिलीप गोडबोले, उत्तम गोडबोले, चेतन भुजबळ, आकाश नरवाडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *