ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा व समर्पण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम

September 25, 202113:23 PM 71 0 0

जालना (प्रतिनिधी):- भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदीजी यांचा वाढदिवस व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या दि.25 सप्टेंबर रोजी असलेल्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पार्टी तर्फे जालना शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन. जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे, शहराध्यक्ष राजेशजी राऊत, माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारणी सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, जिल्हा संघटन सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, नगरसेविका संध्याताई देठे, महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. उषाताई पवार, स्नेहाताई जोशी, प्रा.यास्मिन शेख, दक्षिण भारतीय आघाडी सेलचे शहराध्यक्ष गणेश जल्हेवार, माजी नगरसेविका सखुबाई पनबिसरे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी जालना शहरात तर्फे ईश्रम कार्ड पंतप्रधान गरीब कल्याण योजना रेशन बॅग वाटप, वृक्षारोपण व जाळी बसवणे कार्यक्रम,स्वच्छता अभियान,ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक खुर्च्या बसविणे,नाल्यांच्या उघड्या खड्ड्यांवर ढापे बसविणे, लाभार्थी सन्मान प्रमाणपत्राचे वाटप, आयुष्यमान भारत कार्डचे वितरण, नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवानिमित्त शाडूच्या गणेशमूर्ती व विसर्जनासाठी कुंडी व तुळशीचे रोप वाटप,आंनद नगर येथे महिला शाखेचे उद्घघाटन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते.


मार्च 2021 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत कोरोनाने त्रस्त झालेल्या जनतेला मोफत रेशनचे धान्य,कोरोना लसीकरण करुन दिलेले जिवदान, या विविध योजनामुळे सामान्य जनता पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना वाढदिवसानिमित्त अर्शिवाद देत आहे. हे त्यांच्या भेटी मधुन ते व्यक्त करीत आहे असा अनुभव शहरातील विविध भागामध्ये फिरत असतांना दिसून येत आहे.
प्रसंगी प्रा. राजेंद्र भोसले, सुनिल भालेराव, गोवर्धन कोल्हे, आशिष रसाळ, राजू बिकनेर,सौ.भालेराव ताई,श्रीसुंदरताई, इत्यादी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *