पंचामृत
आज घटाची दुसरी माळ, नैवेद्य साखर आणि त्यापासून बनवलेला पदार्थ!
मंडळी आजचा रंग हिरवा.
हिरवी पाककृती म्हणजे देवीस अत्यंत प्रिय असलेला सूका तांबूल. आणि पंचामृत!
बघा न मंडळी देवी ,देवता जे पुजा पठणात सांगतात तेच किती आरोग्यास पुष्ठीकारक असते. आपण पूजा करतांना पंचामृत घेऊन षोडशोपचारे पूजा करतो.
तेच पंचामृत कीती आरोग्यदायी आहे. पौष्टीक आहे.
पंचामृत कृती.
अर्धी वाटी दूध
एक चमचा साखर
एक चमचा दही
एक चमचा तूप
आणि अर्धा चमचा मध
हे अस प्रमाण घेऊन केलेल पंचामृत औषधी असत,
पंचामृत रोज सकाळी अंशा पोटी खाल्ले तर हे बलवर्धक,पुष्टीकारक,हिमोग्लोबीन वाढवणारे असते.
तसेच प्रेगनंट महीलेने हे सातव्या महिन्यात रोज खावे. फायदाच फायदा.
तर अस हे पंचामृत आपण फक्तघरात पूजाअर्चा असली की तयार करतो!!
असा प्रयोग अधूनमधून करायला काय हरकत आहे नाही!
सुका तांबुल.गडावर सप्तश्रृंगीचा आवडता प्रसाद!!
आजचा हिरवा रंग म्हणून.
51 मघईची पाने.
50 ग्रॅम बडीशोप
प्रत्येकी तीळ
धना डाळ.
पाच वेलदौडे
पाच बदाम
जायफळ पावडर
जेष्ठमध पावडर एक चमचा भर
सूंठ पावडर अर्धा चमचा.
हेसार छान मंद गॅसवर गरम करायचे. मघईचीपाने थोडस तूप टाकुन भाजून घ्या. आणि सारे थंड झाले की मिक्सरवर बारीक करा.आणि गूंजाचा पाला ,आणि आस्मनतारा अगदी थोडुसा घालायचा.असा देवीस प्रिय तांबूल तय्यार.
करुन बघा मंडळी!!!
आदितीज किचन!
मटारच्या विविध रेसिपीज
१)मटार शंकर पाळी
साहित्य:
पाव किलो मटार, एक वाटी रवा, एक वाटी ज्वारीचं पीठ, एक वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ, मैदा, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, एक चमचा मिरचीपूड, एक चमचा जिरे, आवश्यकतेनुसार मीठ
कृती:
१)प्रथम मटारचे दाणे मिक्सरमधून काढून घ्यावेत.
२) त्यानंतर एका परातीत सर्व पीठं एकत्र करुन त्यात इतर साहित्यही मिसळावे.
३) त्यात वाटलेले मटार घालावेत.
४)एका मोठ्या चमच्यामध्ये तेल गरम करून ते पीठात घालावे.
५)पीठ चांगले मळून घ्यावे.
६)मग एक-एक गोळा पातळ लाटून शंकरपाळ्याच्या आकार द्यावा.
७)कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर तळावेत.
८)थंड झाल्यावर कुरकुरीत शंकरपाळी चहासोबत सर्व्ह करावा
२)मटार पॅटिस
सारणाचं साहित्य –
४ वाट्या अगदी ताजे, कोवळे मटारचे दाणे, ४ मध्यम कांदे अगदी बारीक चिरलेले, ४ हिरव्या मिरच्या – दीड इंच आलं एकत्र वाटलेलं, अर्धी वाटी खोवलेलं ओलं खोबरं, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एका लिंबाचा रस, १ टीस्पून साखर (ऐच्छिक), मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल
वरच्या पारीचं साहित्य –
१० मध्यम आकाराचे बटाटे, ६ ब्रेड स्लाइस, १ टेबलस्पून कॉर्न फ्लार, २ हिरव्या मिरच्या-अर्धा इंच आलं-१ वाटी कोथिंबीर एकत्र वाटलेलं, मीठ चवीनुसार
शॅलो फ्राय करण्यासाठी तेल, ४-५ ब्रेड स्लाइस मिक्सरमध्ये फिरवून केलेला चुरा
सारणाची कृती –
१) एका कढईत तेल गरम करा.
२) तेल तापल्यावर त्यात कांदा घाला. परतून झाकण घाला.
३) मधूनमधून हलवत तो चांगला मऊ होऊ द्या. मात्र लाल करू नका. तो गुलाबीच राहायला हवा.
४) कांदा शिजला की त्यात आलं मिरचीचं वाटण, साखर, मीठ घाला.
५) २ मिनिटं परतून त्यात मटार घाला. परत झाकण घाला. मधूनमधून हलवत मटार चांगले शिजू द्या.
६) मटार शिजले की त्यात खोबरं-कोथिंबीर घाला आणि लगेच गॅस बंद करा.
७) सारण चांगलं थंड होऊ द्या.
वरच्या पारीची कृती –
१) उकडलेले बटाटे मॅश करा.
२) ब्रेड स्लाइस मिक्सरमधून काढून त्यात घाला.
३) कॉर्न फ्लोर घाला, वाटण आणि मीठ घाला.
४) हे मिश्रण चांगलं मळून घ्या.
पॅटिसची कृती –
१) पारीसाठी मळलेल्या मिश्रणाचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करा.
२) जरासा तेलाचा हात लावून हातानंच त्या गोळ्याची वाटी करा.
३) वाटीत १ टीस्पून सारण घाला. हलक्या हातानं वाटीचं तोंड बंद करा.
४) हलकेच दाब देऊन पॅटिस चपटा करा. असे सगळे पॅटिस करून घ्या.
५) ब्रेडच्या चु-यात घोळवून तव्यावर तेल घालून मध्यम आचेवर चुरचुरीत लाल होऊ द्या.
मटार पॅटिस तयार आहेत.
३)मटार बाटी
साहित्य-
मटार दाणे 1 वाटी
जिरं अर्धा चमचा
चिंच कोळ 1 चमचा
गूळ अर्धा चमचा
हिंग चिमूटभर
कांदा चिरून
तिखट 1 चमचा
हिरवी मिरची -पुदीना पेस्ट 1चमचा
हळदं अर्धा चमचा
धऩा पावडर अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
गव्हाचं जाडसर पीठ 1 वाटी(ओल्या गव्हाचा)
कोथिंबीर
कृती-
गव्हाचे जाडसर पीठ घेऊन त्यात तेल, मीठ टाकले व भिजवून ठेवले
10मी.ने बाटी बनवून ठेवली
कढईत तेल तापवून त्यात जिरं ,हिंग टाकले ,कांदा चिरून टाकला, हिरवी मिरची -पुदीना पेस्ट, कढीपत्ता, मटार दाणे, हळदं, धना पावडर, मीठ ,चिंच कोळ, गूळ टाकला,पाणी टाकून उकळी घेतली
उकळी आल्यावर त्यात बाटी टाकली व उकळवून घेतले कोथिंबीर घातली
बाटीला चिरून वाढले
वरून कांदा चिरून टाकला.
४)मटार करंजी
साहित्य : सारणासाठी:
२ कप सोललेले मटारचे दाणे
१ टी स्पून तेल
१ टी स्पून लिंबू रस
१/४ कप ओला खोवलेला नारळ
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
आवरणासाठी
१ कप मैदा
१/२ कप रवा बारीक
१ टे स्पून बेसन
१ टी स्पून ओवा, जिरे (भरडून)
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून तेल (कडकडीत)
मीठ चवीने
तेल मटारची करंजी तळण्यासाठी
कृती:
सारणासाठी:
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मटारचे सोललेले दाणे घाला. कढई वर झाकण ठेवून त्यावर पाणी घाला. मटर शिजवून घ्या. कढई मधून मटर काढून थोडेसे ठेचून घ्या. मग त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, लिंबूरस, मीठ व चवीला थोडीसी साखर, ओला खोवलेला नारळ, कोथंबीर घालून मिक्स करून घ्या. हे सारण तयार झाले.
आवरणासाठी: मैदा, रवा, बेसन, मीठ, ओवा-जिरे पूड, हळद, लाल मिरची पावडर मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये कडकडीत तेल घालून मिक्स करून पीठ थोडे घट्ट मळून घ्या. मळलेले पीठ १०-१५ मिनिट बाजूला ठेवा. मग त्याचे १५ एकसारखे गोळे करून घ्या.
एक गोळा घेवून पुरीच्या आकाराचा लाटून घ्या. मग त्यामध्ये एक टी स्पून सारण भरून पुरी मुडपून घ्या. पुरी मुडपल्यावर त्याला करंजीचा आकार द्या. अश्या सर्व करंज्या बनवून घ्या
एका कढईमध्ये तेल चांगले गरम करून घ्या. गरम तेलामध्ये मटारच्या बनवलेल्या करंज्या गुलाबी रंगा तळून घ्या.
गरम गरम करंज्या टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
५)मटार उसळ
साहित्य-
चार वाट्या ताजे मटाराचे दाणे
दोन छोटे कांदे
अर्धी वाटी ओलं खोबरं
तीन-चार लसणीच्या पाकळ्या
गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, गूळ
तेल आणि फोडणीचं साहित्य
कृती:
मटाराचे दाणे शिजवून घ्या. अगदी टणटणीत दाणे नकोत आणि अगदी गाळही शिजवायचे नाहीत. मी बेबीकूकरमधे एक शिट्टी काढून शिजवून घेते, म्हणजे सगळेच दाणे एकसारखे शिजतात.
कांदा उभा पातळ चिरून घ्या. लसणी सोलून घ्या. कढईत अगदी दोन-तीन थेंब तेल तापवून त्यात कांदा-लसूण-ओलं खोबरं खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून मस्त गुळगुळीत वाटून घ्या.
कढईत तेल तापवून मोहरी-जिरं-हिंग-हळदीची फोडणी करा. शिजलेले मटार त्यात परतून घ्या. थोडं पाणी घालून एक उकळी येऊ द्या. मग त्यात कांदा-खोबर्याचं वाटण घाला. लाल तिखट, मीठ, गोडा मसाला, गूळ घालून ढवळा. आमच्याकडे तिखट-गोड या चवी बरोबरीने लागतात त्यामुळे गूळ लागतोच. रस्सा पातळ हवा की अंगासरशी हे आपापल्या आवडीप्रमाणे ठरवा त्याप्रमाणे आवश्यक तेवढं पाणी घालून उसळ मस्त उकळू द्या.
६)चीज मटार बॉल्स
साहित्य –
2-3 उकडून किसलेले बटाटे, अर्धी वाटी थोडे वाफवून घेतलेले मटारचे दाणो, 3 चमचे साबुदाण्याचं पीठ, दोन किसलेले चीज क्यूब्ज, एक वाटी ब्रेडचा जाडसर चुरा, मीठ, मिरपूड, कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल.
कृती – बटाटय़ामधे साबुदाण्याचं पीठ, अर्धी वाटी ब्रेडचा चुरा आणि मीठ घालून गोळा व्यवस्थित मळून घ्यावा. चीजचे वाटाण्याएवढे गोळे करून घ्यावेत. मटारच्या दाण्यात मीठ, मिरपूड, कोथिंबीर आणि किसलेलं चीज घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. एका प्लेटमधे ब्रेडचा चुरा पसरवून ठेवावा. बटाटय़ाच्या मिश्रणाचा छोटय़ा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी करून घ्यावी. त्यात मटारच्या दाण्याचं मिश्रण आणि 2-3 चीजचे छोटे वाटाण्याएवढे बॉल्स भरून पारी बंद करावी. गोल वळून ब्रेडच्या चु:यात व्यवस्थित घोळवून तळून घ्यावेत
हे चीजबॉल्स फॉईलमध्ये घालून डब्यात द्यावेत. बरोबर पुदिना चटणी आणि टोमॅटो केचप द्यावं.
७)मटार वड्या
साहित्य
२ वाट्या मटार
३ वाट्या साखर
१ वाटी दूध
वेलची पूड (आवडीनुसार)
कृती:-
मटार सोलून, मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत.
मटार, साखर, दूध एकत्र करून रुंद भांड्यात गॅसवर शिजत ठेवावे.
शिजतानाच त्यात वेलची पूड घालावी.
मिश्रण सुकत आल्यावर (कडेला सुकल्याच्या खुणा दिसायला लागल्यावर) ताटात ओतून थापून वड्या पाडाव्यात.
८)मटार पराठे
साहित्य :
पाव किलो मटार (वाफवून घ्यावेत), २ उकड्लेले बटाटे, आल लसूण मिरची पेस्ट, कोथींबीर्,तेल, मीठ्, लिंबू रस थोडासा, कणीक व थोडा मैदा.
क्रूती:
प्रथम तेलामध्ये आल लसूण मिरची पेस्ट परतून घावी,नंतर त्यात वाफवलेले मटार, कुस्करलेला बटाटा,व बाकी साहित्य घालावे व परतून खाली उतरवावे. नेहमी प्रमाणे कणीक भिजवावी त्यात एक चमचा मैदा घालावा. वरील मिश्रणावे गोळे करुन , कणकेमध्ये पारीमध्ये भरावे व परोठा लाटून, तव्यावर तूप टाकून परतावा. आवडत असल्यास मिश्रणात थोडे चीज किसून घालावे.
९)मटार समोसा
साहित्य:-
१) अर्धा किलो मटारचे दाने
२) पाव किलो फ्लॉवर
३) एक कोथिंबीरची जुडी
४) एक छोटे लिंबू
५) ७ ते ८ हिरव्या मिरच्या
६) ८ ते ९ लसणाच्या पाकळ्या
७) जिरे पूड एक टीस्पून
८) धने पूड एक टीस्पून
९) एक चमचा लाल तिखट
१०) एक टीस्पून हळद
११) चवीपुरते मीठ
१२) थोडीशी साखर
१३) एक टीस्पून पांढरे तीळ
१५) १२५ ग्रॅम मैदा
१६) अर्धा किलो बटाटे
१७) आणि सामोसा तळण्यासाठी तेल
कृती :-
सर्व प्रथम मटार आणि बटाटे कुकरमध्ये तुमच्या अंदाजानुसार चांगले शिजुवून घ्या. मटार आणि बटाटे शिजत घालून सामोस्यासाठी मैदाचे पीठ तयार करायला घ्या. तुमच्या आवशक्यतेनुसार मैदा घेऊन त्यामध्ये लाल तिखट,एक टीस्पून धने पूड, एक टीस्पून जिरे पूड, एक टीस्पून हळद, थोडीशी हिंग, भाजलेले तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ टाका. त्याचबरोबर त्यामध्ये अर्धी वाटी तेल टाका आणि हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घट्ट मळून घ्या. मैदाचे पीठ चांगले मळून झाले की दोन तास ते पीठ मुरत ठेवा.
तोपर्यंत बटाटे आणि मटार शिजून थंड झाले असतील. बटाटे सोलून सगळे बटाटे एकसारखे बारीक करून घ्या म्हणजेच कुस्करून घ्या. त्याचबरोबर फ्लॉवर निवडून बारीक चिरून घ्या.त्यानंतर मटार, कुस्करलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, लसून,७ ते ८ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला फ्लॉवर तसेच थोडं लाल तिखट, एक टीस्पून हळद, थोडीशी हिंग, एक टीस्पून धने पूड आणि चवीपुरते मीठ टाकून संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. त्याचबरोबर ह्या मिश्रणामध्ये लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
त्यानंतर मैदयाचे पीठ चांगले भिजले असेल तर आता सामोसा तयार करायला घ्या त्यानंतर मैद्याचा एक छोटा गोळा घेवून सर्वात प्रथम त्याची एक पातळ आणि मोठी अशी पोळी तयार करा. जास्तही पातळ करू नका. लाटलेल्या पोळीचे तीन एकसारखे भाग करून घ्या. त्यानंतर तीन पट्यांवर तयार केलेले बटाटा आणि मटारचे मिश्रण एकसारखे सगळीकडे मिश्रण घालून घ्या. मिश्रण घातल्यानंतर मग त्याची खणासारखी त्रिकोणी घडी घाला. अशा प्रकारे सर्व सामोसे तयार करून घ्या. सर्व सामोसे तयार केल्यानंतर कढई मध्ये तेल टाकून सगळे सामोसे चांगले गुलाबी रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तेलामध्ये तळून घ्या. अशा प्रकारे गरमागरम सामोसे तयार होतील.तुमच्या आवडीनुसार कोरडेच किंवा सॉस बरोबर खायला घ्या.
१०)मटार बर्फी
साहित्य :
दीड वाटी मटारदाणे
१ कप दूध
अर्धा कप ताजी साय किंवा क्रीम
दीड वाटी साखर
अर्धी वाटी पिठीसाखर
२ मोठे चमचे साजूक तूप
कृती :
मटारदाणे मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. २ चमचे तूप तापवावे व त्यावर वाटलेला गोळा दहा मिनिटे परतावा. आंच मंद असू द्यावी. दुध, क्रीम, व साधी साखर घालावी. मिश्रण सतत ढवळावे. मिश्रण घट्ट होऊन कडेने सुटू लागले की पिठीसाखर घालून खाली उतरवावे. कोमट होईपर्यंत जरा जोरात ढवळावे. एका ताटाला किंवा ट्रेला तुपाचा हात फिरवून त्यावर मिश्रण पसरावे. गार झाल्यानंतर वड्या कापाव्या.
११)मटार ढोकळा
साहित्य :
अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चणाडाळ, अर्धी वाटी तांदूळ, 1 वाटी वाफवलेले मटार, 2 पालकाची पाने, 4 पानं कढीपत्ता, अर्धा इंच आलचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, 2 चमचा तीळ. सजावटीसाठी 1 चमचा कोथिंबीर, 1 चमचा ताजं खोबरं.
कृती :
तांदूळ, चणाडाळ आणि उडीदडाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. दुसर्या दिवशी निथळून मिक्सरला लावावे. त्यातच आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, हिंग, पालक आणि मटार घालून मिक्सरला लावावे. आता बाऊलमध्ये काढून 7 ते 8 तास झाकून ठेवावे. नंतर त्यात मीठ, तेल, खाण्याचा सोडा आणि थोडेसे पाणी घालून मिश्रण इडलीच्या पीठाप्राणे बनवावे. ढोकळा वाफवण्यासाठी इडली पात्राला तेलाचा हात लावावा. त्यात तयार ढोकळ्याचे मिश्रण चमच्याने घालून 15 मिनिटे वाफवावे. ढोकळा गार झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून ताटात काढाव्यात. पॅनमध्ये गरम तेलात मोहरी तडतडल्या नंतर त्यात कढीपत्ता व तीळ टाकून तयार तडका ढोकळ्यावर पसरवावा.
१२)मटार चटणी
ओला मटार एक वाटी +ओले खोबरे अर्धी वाटी +कोथिंबीर अर्धी वाटी +हिरव्या दोन आणि मीठ चविनुसार मिक्सरवर रवाळ होईल इतपत करा .नंतर एक लहान लिंबू त्या चटणीत पिळाले की साखर अंदाजाने घालून . परत एकत्र करा .हिरवी मटार चटणी तयार.
१३) मटार खीर
मटर खीर
मटर वाफवलेले
तूप
खवा
साखर
बदाम पिस्ता काप
गरम पाण्यात मीठ घालून मटर वाफवणे लगेच गार पाण्यात टाकावे मटरचा रंग बदलत नाही
वाफवलेले मटर बारीक वाटून घेणे एका भांडयात तूप घालून त्यावर परतुन् घेणे ग्यास बंद करणे दूध घालून चांगले मिक्स करुन गालून घेणे मग हे मिश्रण ग्यास वर ठेवणे सतत ढवलत रहाणे उकली यायला लागली की खवा घालणे थोड़े ढवलने साखर घालणे थोड़ी अटवा बदाम पिस्ता काप घाला.
१४)मटार टाकोज
साहित्य –
मका दाणे मटार खोबर कोथींबीर मिरची वाटलेली मीठ लिंबू रस तेल मैदा तांदूळ पीठ चिस ,सॉस
कृती –
मका मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी त्या पेस्ट मध्ये मावेल इतकं मैदा व थोडीशी तांदूळ पीठ थोडं मोहन ओवा हे सगळं मळून घट्ट भिजवावं 15 मिनिटानंतर छोटी पुरी लाटून तेलात टाकावी व टाकल्यानंतर झाऱ्या च्या साहाय्याने अर्धवट दुमडावि मग छान मंद आचेवर तळून घ्यावी हे टाकोज तयार
त्यातील सारण मटार च करावं ते पुढील प्रमाणे
मटार वाफवून घ्यावेत मग अर्धवट वाटून घ्यावे त्यात वाटलेली मिरची ओल खोबर लिंबू रस मीठ कोथिंबीर हे सर्व घालून एकत्र करावे व हे सारंण या टाकोज मध्ये भराव वरून हॉट न स्वीट सॉस टाकावा व चिस घालावं.
अश्विनी निलेश धोत्रे.
Leave a Reply