ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम झाले संपन्न

January 19, 202212:21 PM 68 0 0

काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की ज्यांच्यां सत्कार्याचा नंददीप हा आपल्या स्वस्ताच्या पायापुरता प्रकाश निर्माण न करता दुसऱ्यांच्या जीवनातील अंधारलेल्या वाटा कश्या प्रकाशित करता येतील ह्याच भावनेतून आपलं सर्वस्व अर्पण करत असतात. आणि असचं एक खास दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व सामाजिक कार्यातील महामेरू,तरुणांच्या गळ्यातील ताईत अर्थात जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे संस्थापक अध्यक्ष आणि पानवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते माननीय श्री.डॉ. प्रितमदादा जनार्दन म्हात्रे साहेब यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा आजचा दिवस खऱ्या अर्थाने अनेक समाजपयोगी कार्यांच्या पर्वणीचाच दिवस म्हटलं तर वावगं ठरणारं नाही !

कारण दादांच्या ह्या वर्षीच्या जन्मदिनी दूर-दुर्गम डोंगर दऱ्यांतं ,वाडी- वस्तीवर राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांकरिता एक सपानोकीं सौगत घेऊन आले ते श्री.प्रितमदादा म्हात्रे  यांच्या औदार्यातून त्या आदिवासी बांधवांकरिता खास अशी भेंट मिळाली ती म्हणजे ह्या आदिवासी बांधवांच्यां वाडी वस्तीवरचा खडतर असणारा दळणवळणाचा मार्ग ( रस्ता ) त्यावरून होणारा जीवघेणा प्रवास आणि त्यातच एखादी महिला भगिनी किंवा आदिवासी बांधव आजारी किंवा अपघात ग्रस्त झाला तर त्याला रुग्णालया पर्यंत पोहचविणे म्हणजे एक दिव्यच असते आणि म्हणूनच या आदिवासी बांधवांचं हे दुःख आणि व्यथा पाहून माननीय श्री.डॉ प्रितमदादा म्हात्रे यांच्या औदार्यातून  रानसई उरण येथील आठ आदिवासी वाड्यांकरिता नवीन रुग्णवाहिका देण्यात आली आहे आणि त्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.सोबतच त्या वाडी- वस्तीवरील दीडशे असंघटित कामगार आदिवासी बांधवांनां विनामूल्य ई- श्रम कार्ड बनवून दिली आणि खास करून ह्या आदिवासी बांधवांचीं शान म्हणजे आपल्या विभागच नावं अर्थात रानसई या नावाचं आकर्षक अश्या पद्धतीनं स्टील मेटलने भव्य,सुंदर, आकर्षक असं आय लव्ह रानसई असं नावं बनवून ह्या नामं फलकाचं अनावरण सुद्धा करण्यात आले.
त्याच बरोबर केअर ऑफ़ नेचर सा.संस्थेचे संस्थापक सन्माननीय रायगड भूषण श्री राजू मुंबईकर साहेब यांच्या संकल्पनेतून वेश्वी एकविरा मंदिर डोंगर  पायथ्याशी रॉक ऍनिमल पार्क ह्या रॉक पार्क मध्ये वाघ,वासरू, हरीण,मोर,कोंबडा अश्या विविध प्रकारच्या प्राणी, पक्षांचे पुतळे बसवून तिथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांकरिता मनोरंजन पार्क बनविण्यात आले आहे आणि या रॉक ऍनिमल पार्कचं सुद्धा आज ह्या शुभ प्रसंगी उद्घाटन करण्यात आले.
सोबतच ह्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त पनवेल आपटा विभागातील सारसाई,बागेचीवाडी,गोविंदाचीवाडी, रामवाडी आदिवासी वाडी ह्या आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवानां आणि मोराकोठा कासु बेडी येथील बांधवांना  नारळपाणी,रिअल फ्रुट ज्यूसच्या बॉटल्स, शाम्पू, हेअर ऑईलचं वाटप त्या मतदार संघाचे कार्यसम्राट रा.जि.प.सदस्य मा. श्री ज्ञानेश्वर दादा घरत साहेब व रायगड भूषण मा.श्री राजू मुंबईकर साहेब यांच्या संकल्पनेतून करण्यात आले ह्या सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदन क्षेत्रातील रायगडची बुलंद तोफ ,प्रख्यात निवेदक मा.श्री नितेशजी पंडित यांनी आपल्या ओघवत्या भाषण शैलीत केलं तर त्यांना साथ दिली ती त्यांचे शिष्य आणि निवेदन क्षेत्रातलं एक आदराने घेतलं जाणारं नावं आणि गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष मा.सुनिलजी वर्तक यांनी तर मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते मा. श्री नारायणजी माने साहेब यांनी त्या आदिवासी चिमुकल्यांकरिता खास खाऊ म्हणून सोनपापडीचीं पाकिटं आणली होती ती वाटण्यात आली सोबतीला रिअल फ्रेश फ्रुट नारळपाण्याच्या बॉटल्स देखील वाटप करण्यात आल्या.
रायगड भूषण  श्री राजू मुंबईकर साहेब यांच्या संकल्पनेतून व जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल आणि केअर ऑफ़ नेचर सा .संस्था ,गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे व मित्र परिवार ह्या सामाजिक मंडळांच्या सहकार्यातून साकारलेल्या ह्या श्री प्रितमदादा म्हात्रे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा, ई- श्रमकार्ड वाटप, आय लव्ह रानसई नामं फलक अनावरण सोहळ्याप्रसंगी आणि खास करून रॉक ऍनिमल पार्क उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख सत्कारमूर्ती होते ते ज्यांच्या औदार्यातून ह्या आदिवासी बांधवांना आज पर्यंत डाबर ह्या नामांकित कंपनीचे लाखों रुपये किंमतीचे रिअल फ्रेश फ्रुट ज्यूस, डाबर किड्स शाम्पू, वाटीका शाम्पू,हेअर ऑईल, गुलाबपाणी,रिअल फ्रेश नारळपाणी बॉटल्स, कोरोना किट्स अश्या प्रकारचे समान मिळालं ते डाबर कंपनीचे मॅनेजर… माननीय श्री महेशजी मारुतीराव पवार साहेब आणि  श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या संस्थापक  माननीय सौ.संगिताताई ढेरे मॅडम व माननीय श्री ज्ञानेश्वरदादा घरत साहेब ( विद्यमान रा.जि.प.सदस्य ),मा.अनंताशेठ म्हात्रे साहेब (सामाजिक कार्यकर्ते पनवेल), श्री भारतदादा भोपी साहेब ( उपाध्यक्ष – आगरी,कोळी,कराडी सं.संस्था ), श्री नारायणजी माने साहेब (सामाजिक कार्यकर्ते मुंबई ),प्रदीपदादा पाटील (नेरे विभाग अध्यक्ष – आगरी,कोळी,कराडी सं.संस्था) ,झाकीरदादा काकर,श्री श्याम लेंडे( सामाजिक कार्यकर्ते रानसई),श्री विलास ठाकूर (सेक्रेटरी कॉन ) श्री अनिल घरत (उरण तालुका सचिव- आगरी,कोळी,कराडी सं संस्था),श्री हिराचंद म्हात्रे (उपाध्यक्ष -गोल्डन ज्युबली मित्र मंडळ ),श्री देवीदास पाटील ( कार्याध्यक्ष गोल्डन ज्युबली मंडळ),श्री जितेंद्र म्हात्रे( गोल्डन ज्युबली मंडळ),नितेश मुंबईकर ,श्री संपेश पाटील ( अध्यक्ष – मित्र परिवार),श्री रोशन पाटील* ( उपाध्यक्ष मित्र परिवार),श्री क्रांती म्हात्रे ( कार्याध्यक्ष मित्र परिवार),गोपाळ म्हात्रे सर ( आंतरराष्ट्रीय कराटे कोच ), श्री समाधान पाटील (समाज कार्यकर्ते पिरकोन ),कु.केतन म्हात्रे…आणि …सोबतच रानसई प्राथमिक शालेच्या शिक्षिका सौ.कडू मॅडम, सौ.ठाकूर मॅडम मदतनिस … कु.कविता आणि रानसई येथील आठ आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधव ,महिला भगिनीं, विद्यार्थीवर्ग यांच्या उपस्थितीत हा अनोखा आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *