जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरातील मस्तगड मंम्मादेवी चौक मस्तगड जूना जालना येथील मंम्मादेवी शॉपिंग सेंटरमधील व्यंकटेश ऑटो पार्टच्या दुकानाला दि. 1 मार्च 2021 रोजी अचानक मध्यरात्री आग लागून जवळपास 16-18 लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या विषयी सविस्तर माहीती अशी की, मस्तगड जुना जालना येथे संजय निवृत्ती कदम यांचे मंम्मादेवी शॉपिंग सेंटरमध्ये व्यंकटेश ऑटो पार्टसचे दुकान जवळपास 10-15 वर्षापासून चालवित आहे. या दुकानाला दि. 01 मार्च 2021 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानातून धुर निघत असल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात येताच. त्यांनी सदरील घटनेची माहीती अग्निशमन विभागाला दिली.
आग लागल्याची माहीती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत व्यंकटेश ऑटो पार्टचे दुकान जळून खाक होऊन या दुकानातील स्पेअर स्पार्टसह दुकानातील फर्निचरचे 16 ते 18 लाख रूपयांचे मोठे नुकसान झाल्याची माहीती दुकान मालक संजय कदम यांनी दिली.
ही आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त केला जातो आहे. आग आटोक्यात आल्याने या दुकानाच्या शेजारील संपुर्ण शॉपिंग सेंटरमधील दुकानाचे आर्थिक नुकसान व जीवीत हानि टाळता आली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल्याच्यावतीने संतोष काळे, नितेश ढाकणे, दत्ता मोरे, विठ्ठल कांबळे, अशोक गाढे, रवि तायडे, विनायक चव्हाण, रवी बनसोडे संबधित विभागाच्या सर्व जवानांनी शर्तीचे पर्यंत करून आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टाळता आला.
सदरील घटनेची माहीती श्री कदम यांनी तहसील कार्यालय जालना यांच्याकडे केली असता. घटना घडलेल्या ठिकाणी तहसीलदार श्री भुजबळ यांनी जालना शहराचे तलाठी अनिल पाटील यांना पाठवले असता तलाठी श्री पाटील यांनी दुकानाची स्थळ पाहणी केली असता सदरील दुर्घ घटनेत व्यंकटेश ऑटो पार्टमधील टु-व्हीलरचे ऑटो पार्टचे अंदाजे 10-12 लाख रूपयांचे नुकसान व दुकानातील फर्निचरचे अंदाजे 5-6 लाख रूपये असे एकूण अंदाजे 16-18 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे पंचनांम्यात नमुद करण्यात आले आहे.
Leave a Reply