ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यामंदिर कोकिसरे नारकर वाडी शाळेचे उज्वल यश

May 8, 202221:29 PM 26 0 0

सिंधुदुर्ग (सौ.संपदा बागी देशमुख) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेचा 2021- 22 चा निकाल जाहीर झाला आहे. सुमारे दोन लाखांची बक्षिसे असणाऱ्या या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 18 केंद्रावर 5200 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना सावंत तसेच संस्थापक अध्यक्ष संदेश सावंत यांनी अभिनंदन केले आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले जाईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या या स्पर्धेत विद्यामंदिर कोकिसरे नारकर वाडीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.या परीक्षेसाठी प्रशालेतील 13 विद्यार्थी होते. प्रशालेचा निकाल 100 % लागला आहे. या परीक्षेत इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी दिव्या दीपक सूर्यवंशी हिने जिल्हा गुणवत्ता यादीत बाविसावा क्रमांक प्राप्त करून रोख रक्कम, सन्मानपत्र व सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.
अथर्व संजय साबळे (इ. 3 री) याने वैभववाडी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून रोख रक्कम, सन्मानपत्र व रौप्यपदकाचा मानकरी ठरला आहे. स्वरांजली प्रसाद पवार (इ.3 री) व अनंत विवेकानंद नाईक (इ. 3 री ) हे दोघेही कांस्यपदक चे मानकरी ठरले आहेत.


रिया दत्तात्रय माईणकर व तन्वी अनिल सूर्यवंशी या इ. चौथीतील विद्यार्थिनींनी वैभववाडी तालुक्यात अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक पटकावून रोख रक्कम, सन्मानपत्र व कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री.संजयकुमार शेट्ये व सौ.ज्योती पवार यांचे विशेष मार्गदर्शन तसेच सौ.संपदा बागी-देशमुख व श्री.समीर सरवणकर, पालक यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शा.व्य.समिती अध्यक्ष व सदस्य, माता पालक संघ व शिक्षक पालक संघ नारकरवाडी चे सदस्य, केप्र. मा.श्री.पवार, विआ. मा.श्री.वडर, गशिअ मा.श्री. शिणगारे तसेच शिक्षक वर्तुळातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *