ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विद्यामंदिर कोकिसरे नारकरवाडी प्रशालेत साभिनय वेशभूषा स्पर्धेने रंगला महिला दिन

March 14, 202212:44 PM 60 0 0

सिंधुदुर्ग प्रतिनिधी (सौ.संपदा बागी-देशमुख)महिलांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिन जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगभरात विविध पद्धतीने साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा,कर्तृत्वाचा, त्यागाचा, समर्पणाच्या जाणिवेचा आणि बदलत्या काळानुसार तिच्या हक्काच्या सन्मानाचा,कौतुकाचा दिवस होय. खूपदा हा दिवस महिलांसाठी निव्वळ पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गंमतीदार खेळ घेऊन साजरे केले जातात.

विद्यामंदिर कोकिसरे नारकरवाडी प्रशालेत मात्र भारतातील थोर स्त्रियांच्या कार्याची जाणीव व्हावी, त्यांच्या लढ्यानेच आज आपल्याला प्रगतीची द्वारे खुली झालेत याचे स्मरण व्हावे आणि पुन्हा नव्याने काही करायची उर्मी मिळावी यासाठी महान स्त्रियांची साभिनय वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला सर्व महिला पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पुढील महिलांनी यश संपादन केले. सौ.आराध्या उदय घोगळे (आजची स्त्री – प्रथम क्रमांक) सौ.स्वप्नाली अजित दिघे (क्रां. सावित्रीबाई फुले -द्वितीय क्रमांक) सौ. दीपाली नंदकिशोर मोरे ( सईबाई – तृतीय क्रमांक) सौ.नव्या नागराज भादवणकर (मातोश्री जिजाबाई – उत्तेजनार्थ)

या स्पर्धेच्या अध्यक्षपदी सौ.समीक्षा दाजी पाटणकर ( ग्रामपंचायत सदस्या कोकिसरे) होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्या. श्री संजयकुमार नामदेव शेट्ये यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संपदा कानिप बागी-देशमुख यांनी केले तर आभार सौ.ज्योती जयवंत पवार यांनी मानले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ.शीतल राजेंद्र पाटील (विजिष अकॅडमीच्या संचालिका) सौ. स्नेहल सुनील रावराणे (विषयतज्ञा बी.आर.सी वैभववाडी) या लाभल्या.
विद्यामंदिर कोकिसरे नारकरवाडी ही शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते.महिलांनी निर्भयपणे बोलले पाहिजे, त्यांच्यात सभाधीटपणा आला पाहिजे. त्याचबरोबर महान स्त्रियांचे स्मरण व्हावे, प्रेरणा मिळावी यासाठी ही स्पर्धा महिलादिनी आयोजित केल्याबद्दल अध्यक्षा सौ.पाटणकर यांनी गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमासाठी शा.व्य.स.अध्यक्ष श्री. राघोबा नारकर व उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र नारकर केप्र.श्री शिवाजी पवार सर विअ. मा. वडर सर,मा.गशिअ श्री. शिनगारे सर यांनीही महिलादिनाच्या शुभेच्छा आवर्जून दिल्या.सर्व माता पालकांनीही प्रशंसा करून आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सौ. सरिता जाधव (बी.आर.सी)शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघटना व माता पालक संघटनेचे सदस्य हजर होते.संध्याकाळी चहापानानंतर एक नवीन ऊर्जा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *