ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जे एन पी टी मध्ये दक्षता जनजागृती सप्ताहला सुरुवात भ्रष्टचार समूळ नष्ट करण्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा

October 27, 202113:48 PM 12 0 0

उरण (संगिता पवार ) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या जे एन पी टी बंदर प्रशासनाने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, शेवा, येथील दक्षता जागरुकता सप्ताह- २०२१ ची थीम आहे ” स्वतंत्र भारत @ ७५ सचोटीसह स्वावलंबन”,यामध्ये दक्षता जागरुकतासप्ताहादरम्यान ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍इन्फॉर्मर (पीआयडीपीआय) दृढनिश्चय करणे, अंतर्गत प्रक्रियेत सुधारणा आणि इतर हाऊस कीपिंग क्रिया कला, भ्रष्टाचार निर्मूलन यांवर देखील लक्ष केंद्रित केले आहे. “स्वतंत्र भारत@ ७५ सचोटीसह स्वावलंबन”, या संकल्पनेनुसार विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१५ वाजता जे एन पी टी येथे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ घेतली.


जे एन पी टी मार्फत दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त जन जागृती केली जात आहे. यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्य मध्ये दक्षता मोहिमे अंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयात लाच घेणे अथवा लाच देणे गुन्हा आहे, तसेच अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी व सर्व नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन लाच मागणाऱ्या विरुध्द तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कोणतेही काम हे कायद्याच्या नियमात राहून केले पाहिजे त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांचे कठोर व प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. कोणी पैशाची मागणी करत असल्यास त्याची तक्रार संबंधित विभागाकडे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच पैश्याची कोणतीही मागणी न करता काम करण्याचे , भ्रष्टाचार ही किड असून त्याचा नायनाट करणे हे आपले कर्तव्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी विद्याधर ए मालेगावकर IRTS – मुख्य दक्षता अधिकारी , कुमार एम अंकलेकर – Dy. मुख्य दक्षता अधिकारी , जितेंद्र आर गद्रे सहायक व्यवस्थापक (दक्षता) , विश्वास बी खैरनार – अधीक्षक (दक्षता), प्रशांत एस शुक्ला – सहायक अभियंता (दक्षता) व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *