ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

करोना योध्दा पुरस्कार देवून विजय आगळे यांचा पुण्यात गौरव

September 3, 202115:04 PM 45 0 0

जालना (प्रतिनिधी) पूणे येथील रोल बॉल असोसिएशन मार्फत जालना जिल्हा रोल बॉल असोसिएशनचे सचिव विजय आगळे यांना करोना योध्दा पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय क्रिडा दिन 29 ऑगस्ट व मेजर ध्यानचंद यांचे वाढदिवसानिमित्त कोरोना योध्दा म्हणून जालना येथील विजय आगळे (सचिव) जालना जिल्हा रोल बॉल असोसिएशन जालना यांचा पूणे येथे रोल बॉलचे जनक राजू दाभाडे व गजानन थरपूडे (अध्यक्ष पूर्ण रोलबॉल असोसिएशन व अध्यक्ष पूणे शहर अध्यक्ष शिवसेना आघाडी) यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी आनंद यादव सचिव एशिएन रोल बॉल ,प्रताप पगारे व महाराष्ट्रातुन आलेले सर्व मान्यवर उपस्थित होते. विजय आगळे यांनी क्रीडा क्षेत्र, सामाजिक व सर्पमित्र म्हणून शहरी व ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना वेळोवेळी रात्री अपरात्री भ्रमणध्वनीवरून साप पकडून त्यांना जीवदान दिले. जालना जिल्हयात त्यांचे कार्य पाहुन त्यांना हा गौरव पुरस्कार देण्यात आला. त्यांचे किशोर आगळे, शिवाजी चव्हाण, गोपीकिशन गोगडे, नंदु सुपारकर, डॉ. प्रदिप हुशे , शुभम शिंदे, उमेश जैस्वाल, गणेश तिडके सरपंच देवमुर्ती, जयंत देशमुख, शंकरराव मोरे, आदींनी अभिनंदन केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *