ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खडकपूर्णा नदीतील अवैध वाळू उपस्याकडे वरिष्ठांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष नैसर्गिक साधन संपत्ती लोप पावत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

April 30, 202112:38 PM 104 0 0

जालना,दि. 28 (प्रतिनिधी) मंठा तालुक्यातील खडकपूर्णा नदीत अवैधरित्या सुरु असलेल्या वाळू उपस्याकडे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती लोप पावत चालली असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात अ. भा. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख व कैलास सरकटे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंठा तालुक्यात खडकपुर्णा नदीत अवैधरत्या वाळु उपसा सुरु आहे. खडकपुर्णा नदी ही मंठा तालुक्यातुन 12 गावातुन जाते. नवदा धारकाला शसकिय नियमाचे पालन करणे बंधनकारक राहते. मुल्यमापन न करता वाळुचा उपसा अवैधरित्या होत आहे. या संदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघा, शाखा मंठा 22 एप्रिल 2021 रोजी विभागीय आयुक्तांंना निवेदन देऊन दोषी विरूध्द कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

खडकपुर्णा नदीत गेल्या दोन महिन्यापासुन शासनाच्या नियमाला हडताळ फासुन व शासकयि नियम धाब्यावर बसवुन मंजुरी अधिक ब्रॉसवाळुचा उपसा केला जात आहे शासकिय अधिकारी व कर्मचारी हे निविदाधारकांशी संगनमत करुन शासनाच्या करोडो रुपयांच्या महसुलाचे नुकसान करीत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला असून वाळु उत्खनन व वाहतुकीची वेळ सकाळी सहा ते सायंकाळी 6 वाजेची असतांनाही या वेळेशिवाय वाळुचे उत्खनन सुरुच असते. लिलावात मंजुर केलेल्या वाळुसाठया इतकेच उत्खनन करणे बंधनकारक राहते. बेंच मार्क निश्चित केल्यानंतर बेंच मार्क च्या खाली वाळुचा उपसा करता येत नाही. लिलावधारक बेंच मार्क च्या खाली वाळु उपसा करीत आहे हे अवैधरित्या सुरु आहे. नदीपात्रात वाळु उत्खनन व वाळु वाहुतकीचे सी.सी.टी.व्ही द्वारे चित्रण करुन दर पंधरा दवसाला त्यांची सिडी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. परंतु लिलावधारकाने तसे न करता अधिकारीव कर्मचारी यांना हातांशी धरुन वाळुचा अवैध उपसा लावला आहे.लिलावधारकाने त्याच्या लिलाव स्थळी वाळुची वाहतुक करण्यासाठी वाहनास त्याच्या वहन क्षमते इतक्याच वाहतुक बंधनकारक असते. निविदाधारक निविदेप्रमाणे वाहन मर्यादेच्या आत वहन क्षमता असलेली वाहने अनिवार्य असतांना जास्त मर्यादा असलेल्या वाहनातुन वाळुची वाहतुक व उपसा होत आहे. लिलावधारकाने नदीपात्रामध्ये वाळु वाहतुकीसाठी मोठी वाहने नेता येणार नाहीत. नदीपात्रा मध्ये मोठया वाहनाद्वारे वाळुचा उपसा होत आहे व तेथुनच ती विक्रीसाठी पाठवली जात आहे. या संदर्भात मराठा महासंघातर्फे वेळोवेळी निवदेन देऊन सुध्दा अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे तसेच विचारणा केली असता अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देत आहे. वाळु निविदाधारक नियमित पणे वाळुचा उपसा जेसीबी द्वारे करतात तसेच जेसीबीद्वारेच उत्खनन केलेल्या जागेचे समाणीकरण करतात. ते करत असतांना कुठेही त्या वाळुच्या घाटाचे मुल्यमापन करण्यात येत नाही. वाळु घाटाचे मुल्यमापन होत असतांना गावातील सरंपच, ग्रामस्थ, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सेवाभावी संस्था, गावातील सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, शेतकरी याची समिती नेमण्यात यावी. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघा, शाखा मंठा यांच्या निवदेनातुन करण्यात आलेली आहे. तसेच शासनाने या अवैध उपसावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा अखिल भारतीय मराठा महांसघात मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल. वाळु घाटाचे मुल्यमापन करतेवेळी शासनाच्या निर्देशाप्रमाणे नेमण्यात आलेल्या समिती सोबत यांना ही वाळु घाटाचे मुल्यमापन करतेवेळी बोलविण्यात आले पाहिजे. जेणेकरुन वाळु घाटाचे मुल्यमापन हे पारदर्शक होईल. निवदेन देतांना तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, तालुका कोषाध्यक्ष कैलास सरकटे, गजानन सरकटे, तळणी सर्कल अध्यक्ष उमेश सरकटे यांची उपस्थती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *