ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थ बायकापोरांसह धडकणार

August 8, 202212:29 PM 14 0 0

उरण ( संगिता पवार ) : दि. ०६ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामसुधारण मंडळ हनुमान कोळीवाडा यांची गावातील सर्व ग्रामस्थ, महिला यांच्या उपस्थितीत संध्याकाळी ०५.३० वाजता हनुमान मंदिरात शेवा कोळीवाडा ( हनुमान कोळीवाडा ) गावाचे गव्हर्मेंट नॉर्मनुसार ८६ शेतकरी व १७० बिगर शेतकरी अशा एकूण २५६ कुटुंबांचे पुनर्वसन आढावा बैठक पार पडली.
दि. १७ नोव्हेंबर २०२१ रोजी मा. जिल्हाधिकारी, रायगड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गव्हर्मेंट नॉर्मनुसार पुनर्वसनासाठी लागणारी जमीन, नागरी सुविधा, २५६ भूखंड, व राहत्या घरांचे चालू बाजार भावाप्रमाणे मूल्यांकन देण्याचा निर्णय झालेला होता. त्यासाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची कमिटी स्थापन करून पुनर्वसनाचा दर आठ दिवसांनी आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतलेला होता.
दि. २४/११/२०२१ रोजी शासनाचे अधिकारी, JNPT अधिकारी,पोलीस अधिकारी, शेवा कोळीवाडा विस्थापित, यांनी संयुक्तपणे पहाणी करून कस्टम वसाहत जवळील गाव नकाशा जसखार व फुंडे येथील JNPT ची विकसित जमिन देण्याचे JNPT ने मान्य व कबुल केलेलें आहे. . मा.मुख्य प्रबंधक व सचिव JNPT यांनी दि.१२/०५/२०२२ रोजी मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख,उरण याना JNPT च्या विकसित (जसखार -फुंडे ) येथील शेवा कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी कऱण्यास अर्ज दिला होता.
मा.उप अधीक्षक भूमी अभिलेख,उरण यांनी दि. १७/०६/२०२२ रोजी JNPT च्या विकसित जसखार व फुंडे च्या जमीन मोजणी करून नकाशा तयार करून JNPT ला दिलेला आहे.

JNPT ने तयार केलेल्या नकाशात सुधारणा करण्यासाठीं मा. नगर रचनाकार यांनी दि.१७/०१/२०२२ रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या कडे शासनाचे मापदंडाचे नकाशासाठी १ ते १० मुद्यांचे दस्तावेज मागितले होते. व सिडको ने दि.२८/०३/२०२२ रोजी नकाशात पुनर्वसन कायदा नुसार सन १९८५ साली मंजूर असलेले २५६ भूखंड व शासनाचे माप दंडा नुसार नागरी सुविधा MRTP Act,1966 & UDCPR प्रमाणे देऊन आराखडा तयार करण्यास JNPT ला सांगितलेला आहे. त्या नुसार JNPT नी आजतागायत नकाशा तयार केलेला नाही. ग्रामस्थांनी व पोलीस प्रशासनानी वारंवार पाठपुरावा करून गेली आठ महिने उलटून हि पुनर्वसनाचा आराखडा तयार होत नाही. आणि मा. जिल्हाधिकारी रायगड हनुमान कोळीवाडा पुनर्वसन कमिटीला भेटण्यासाठी वेळ देत नाहीत. पण मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी शासनाने विस्थापित हनुमान कोळीवाडा गावात नवीन ग्रामपंचायत स्थापना करून दिली होती.त्या वेळी हनुमान कोळीवाडा गावातील भूखंड धारक शेतकरी ८६ व बिगर शेतकरी १७०मिळून २५६ कुटूबे यांची यादी सह १७ हेक्टर जमिनीचा मौजे हनुमान कोळीवाडा गाव वहिवाट नकाशा व आकारबंध आणि गाव नमुना नंबर ७/१२ वगैरे वगैरे दस्तावेज देऊन आजतागायत ताबा दिलेला नाही. असे असताना दि.०८/०८/२०२२ रोजी दुपारी ३ वाजता अतिक्रमण विषयी सरपंचांचे विरोधात मा.जिल्हाधिकारी साहेबानी सुनावणी ठेवली आहे.मा.जिल्हाधिकारी साहेब पुनर्वसन बाबत वेळ देत नाही म्हणून त्यांनी दिलेल्या वेळेत ग्रामस्थ भेटून च्या जमिनीचा कायदेशीर पुनर्वसन नकाशा देत नाही, ३५ वर्षाचा मानवी हक्कांचा छळ व सहनशीलतेचा अंत झाल्याने शासनाने ज्या कारणासाठी मूळ शेवा कोळीवाडा गावठाण संपादन केलेले आहे त्या कारणासाठी त्याचा अद्याप वापर झाला नसल्याने गावाचा ताबा घेण्याचा ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय कळविण्यासाठी हनुमान कोळीवाडा गावातील सर्व ग्रामस्थ दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ०३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत.
अशी माहिती अध्यक्ष सुरेश दामोदर कोळी व उपाध्यक्ष मंगेश अनंत कोळी ग्रामसुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा यांनी दिली .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *