जालना दि.22- दि. 19 जुलै 2021 रोजी ट्रफिक संस्था मुंबई वाईल्डलाईफ यांचे कडून मिळालेल्या गुप्त माहितीवरुन वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षण प्राप्त असलेला वन्यप्राणी मांडुळ अनुसूची 4 एसआर 3 यास फेसबुक पोस्टच्या आधारे जाहिरात देऊन विक्रीसाठी उपलब्ध असलेबाबत मुहेम्मद रफिक मोहम्मद याकुब रा. देऊळगावराजा जि बुलढाणा वय 47 वर्ष यांचे फेसबुकद्वारे प्रसिध्द केली त्या अनुषंगाने मिळालेला गुप्त माहितीनुसार त्यांना अटक करण्यात आली. व त्यांचेकडुन माहिती प्राप्त करुन घेऊन विशाल भिमराव सरदार वय 25 वर्ष रा. चिखली जि. बुलढाणा यास वन्यप्राणी मांडूळ हाताळणे, प्रदर्शन करणे, व्हिडीओ शुट करणे, व खरेदी विक्री करणे त्यासाठी सोशल मिडीआवर जाहिरात प्रसिध्दी करणे या कृती केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चा भंग केल्याने चौकशी कामी ताब्यात घेऊन चिखली येथून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन न्यायालयासमोर वन गुन्हा दि.22 जुलै 2021 पर्यंत आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
या कार्यवाई मध्ये वनसंरक्षण प्रादेशिक, औरंगाबादचे सत्यजित गुजर,सुर्यकांत मंकावार, उपवनसंरक्षण प्रादेशिक औरंगाबादचे सचिन कंद, विभगीय वन अधिकारी तेंदू व इतर औरंगाबाद यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनपरिक्षेत्र ( रोहयो व वन्यजीव ) पुष्पा पवार यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी ( स्टा्रइ्रक फोर्स ) आनंद गायके, वनपरिक्षेत्र अधिकारी जालना (दक्षिण), अभय अटकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, जालना ( उत्तर), श्रीकांत इटलोड ,वनपाल मनोज कांबळे, श्री. बुरकुले, श्री. पचतौरे, वनरक्षक गोंविद वैद्य, अनिल जाधव, मनोज कुमावत, प्रकाश सुर्यवंशी, सुधीर धवण, श्री. गुसिंगे,श्री डोमले, श्री. मुटके, श्री. दांडगे, श्री तेलंगे, श्री माटे, श्री. हिरेकर, श्रीमती अनिता भावले, श्री सोडगीर यांनी केली. यापुढील तपास चौकशी अधिकारी एस.डी.इंटलोड, वनपरिक्षेत्र अधिकारी जालना ( उत्तर) हे करीत आहे. असे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा), जालना यांनी कळविले आहे.
Leave a Reply