ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ योगी सरकारचा विरुध्द जालन्यात कॉग्रेसचे जोरदार निदर्शने

October 5, 202113:30 PM 17 0 0

जालना (प्रतिनिधी) ः उत्तरप्रदेश येथील लखीमपुर खीरी येथे शेतकर्‍यांच्या मृत कुटूंबाना भेटण्यासाठी जात असतांना पोलीसांनी कॉग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांना अडवून त्यांच्याशी गैरव्यवहार केल्याचे निर्षेधार्थ जालना जिल्हा व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या पोलीस प्रशासनाच्या विरोद्धात जुना जालना गांधी चमन येथे सोमवार रोजी दुपारी जोरदार निदर्शने करण्यात आली.


शेतकर्‍यांविरोध्द असलेले तीन काळे कायदे मागे घेण्यात यावे म्हणून गेल्या 10-11 महिन्यापासुन शेतकर्‍यांचे आंदोलन चालू आहे.हे आंदोलन दडपशाही मार्गने संपविण्याचा केंद्र सरकारचा डाव असून उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये रविवारी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आठ शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. लखीमपूर खेरी या ठिकाणी मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणार्‍या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना अटक मुख्यमंत्री योगी यांच्याकरवी पोलीसांकडुन अटक करण्यात आली. व तसेच पोलीसानी श्रीमती प्रियंका गांधी यांच्याशी धक्का बुक्की करुन गैरव्यवहार केला आहे. हे दुदैर्वी कृत्य संपुर्ण देशाने बघितले आहे. भाजप सरकारची दडपशाहीला मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोल यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यात तिव्र निदर्शने करण्यात आली. जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर कॉग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, प्रदेश सचिव संत्सग मुुंढे, माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर भांदगे, प्रभाकर पवार, जिल्हा सरचिटणीस राम सावंत, महिला जिल्हा कॉग्रेसच्या अध्यक्षा विमलताई अगलावे, सुधाकर निकालजे, सुषमाताई पायगव्हाणे, नंदाताई पवार, शितलताई तनपुरे यांनी आपल्या भाषणातून कॉग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांना अटक केल्याप्रकरणी योगी सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी कॉगे्रस कार्यार्त्यांनी योगी आणि मोदीच्या विरोध्दात जोरदार घोषणाबाजी करुन प्रियंका गांधी आगे बडो अशा गगनभेदी घोषणा दिल्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष वसंत जाधव, बदर चाऊस, विठ्ठलसिंग राणा, शेख रऊफ परसुवाले, नारायण वाढेकर, जावेद बेग, डॉ. विशाल धानुरे, शेख शमशु, चंद्रकांत रत्नपारखे, रोहिदास गंगातिवरे, फकीरा वाघ, नगरसेवक शेख शकील, मुक्तार खान, ज्ञानेश्‍वर डुकरे, चंदाताई भांगडीया, मंगलताई खाडेभराड, सय्यद करीम बिल्डर, रहिम तांबोळी, जावेद अली, रामजी शेजुळ, संतोष मदन, लक्ष्मण कोरडे, रघुविर गुडे, राहुल साळवे, अनस चाऊस आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *