ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

घटना विरोधी वक्तव्याबद्दल मंञी विड्डेटीवारांचा मराठा क्रांती मोर्चा तर्फे निषेध।

January 26, 202114:07 PM 118 0 0

जालना ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या न्या. गायकवाड आयोग बोगस असल्याचे घटना विरोधी वक्तव्य केल्याबद्दल मंञी विजय विड्डेटीवार यांचा मराठा क्रांती मोर्चा तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. साष्टपिंपळगाव ता. अंबड येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनास सोमवारी ( ता. २५) मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी भेट देऊन या आंदोलनात सहभाग नोंदवला. या वेळी समन्वयकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जालना शहरात काल झालेल्या ओबीसी मोर्च्याच्या समारोप प्रसंगी मंञी विजय विड्डेटीवार यांनी न्या. गायकवाड आयोग बोगस असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या घटना विरोधी वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने घटनेच्या आधीन राहून न्या. गायकवाड मागासवर्गीय आयोगाचे गठण केले. या आयोगाने सर्व जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणाअंती मराठा समाजाचे आर्थिक व शैक्षणिक मागासलेपण या बाबत समर्पक अहवाल राज्य शासनास सादर केला. दोन्ही सभागृहांत सदर अहवाल सर्वानुमते स्विकारला. मराठा समाज आरक्षणास पाञ असल्याचे सदर अहवालात नमूद केले होते.
विशेष म्हणजे मंञी विजय विड्डेटीवार हे तत्कालीन विरोधी पक्षनेते असतांना आयोग बोगस असल्याचा आक्षेप सभागृहात का नोंदवला नाही ? असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चा तर्फे उपस्थित करण्यात आला.
दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करून राज्य घटनेचा अवमान करणारे मंञी विजय विड्डेटीवार यांच्या बाबतीत त्यांचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री कुठली भूमिका घेतील या कडे सकल मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
या वेळी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक राजेश राऊत, विष्णू पाचफुले, संतोष गाजरे,सतीश देशमुख, अरविंद देशमुख, जगन्नाथ काकडे, ज्ञानेश्वर ढोबळे, अशोक पडूळ, महेश निक्कम, प्रशांत गाढे, संजय देठे, संदीप नाईकवाडे, पंकज जऱ्हाड, रवींद्र जगदाळे, विजय वाढेकर,रवी गंगाधरे, करन जाधव, संतोष कराळे, शुभम टेकाळे, अक्षय चिखले,कैलास खांडेभराड, विनोद जाधव, ज्ञानेश्वर उढाण, किरण चौधरी, माधव कदम, राहुल ढोरकुले यांच्या सह समन्वयक व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *