ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बहुचर्चित लफडं या सिनेमात दिसणार उरण-भेंडखळ गावचा सुपुत्र विपुल प्रकाश भोईर

October 29, 202113:57 PM 54 0 0

उरण (संगीता ढेरे ) महेश थोरात यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या लफडं या चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग व कलाकार परिचय यासंदर्भात एक शानदार कार्यक्रम रविवार २४ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील झालेत व पोस्टर अनावरण सोहळा पार पडला तसेच लफडं या चित्रपटाच्या कलाकारांचा परिचय देखील झाला. लफडं या चित्रपटात उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे सुपुत्र विपुल प्रकाश भोईर हा एका चांगल्या भूमिकेत दिसणार आहे व विपुल याने या अगोदर बऱ्याच फिल्म केल्या असून त्याने लफडं या फिल्म साठी धुळे या शहरात ऑडिशन दिले व त्यात त्याची निवड झाली लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण विविध ठिकाणावर होणार आहे.

या चित्रपटात बहुतांशी कलाकार हे नवोदित असून चित्रपटाचे दिग्दर्शक महेश थोरात हे असून निर्माता महेश थोरात व श्रीमती सीमा साखरकर हे आहेत तसेच असोसिएट दिग्दर्शक सचिन बिऱ्हाडे हे करणार असून गीत संगीत नितीन-प्रसाद टीम यांचा असेल तसेच प्रॉडक्शन श्री चेतन सोनार व भटू चौधरी हे बघणार आहेत लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण होऊन हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे .
महाराष्ट्रातील तमाम रसिकप्रेक्षकांना विनम्र विनंती आहे की हा चित्रपट आपण सर्वांनी नक्कीच चित्रपट गृहात जाऊन बघावा असे आवाहन महेश थोरात फिल्म प्रोडक्शन व श्रीमती सीमा साखरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *