ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विश्वकर्मा जयंती दिन हा कामगार दिन साजरा व्हावा : सुधिर घरत

September 18, 202114:10 PM 41 0 0

उरण ( संगिता पवार ) साऱ्या विश्वाचे शिल्पकार व वास्तुकार ज्यांनी हे विश्व घडविले, स्वर्गलोग, इंद्रप्रस्थ द्वारका ., जगन्नाथ पुरी, लंका अशी नगरे निर्माण केली. भगवान शंकरांचे अस्त्र त्रिशूल व भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र बनविले .अनेकअवजारांची निर्मिती करून कारागिरांना त्यांचे काम करणे सुलभ करून दिले अशा करोड़ो हातांना रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या विश्वाचे शिल्पकार विश्वकर्मा यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर हा दिवस कामगार दिन म्हणून साऱ्या देशभर साजरा व्हावा अशी मागणी कामगार नेते भारतीय पोर्ट
अॅण्ड डॉक मज़दूर महासंघाचे (Bms) राष्ट्रीय खजिनदार सुधीर घरत यांनी जेएन पी.टी. टाऊनशीप येथे संपन झालेल्या कामगार मेळाव्यात केली.


विश्वकर्मा जयंती दिना निमीत जे.एन पी.टी. टाऊनशिप येथे भारतीय मजदूर संघ (रायगड) जे.एन.पीटी . जनरल कामगार संघटना व भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक मजदूर महासंघाच्या वतीने कामगार मेळाव्याचे आयोजन केले. यावेळी कामगार नेते सुधीर घरत यांनी १ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा नकरता विश्वकर्मा जयंती दिवस हा कामगार दिन साजरा करावा असे विचार व्यक्त केले.

भारतीय मजदूर संघ ही कामगारांच्या हितासाठी सर्वस्व पणाला लावणारी संघटना असुन इतरांसारखी खोटी आश्वासने न देता देशहित नजरेसमोर ठेऊन उद्योगहित व कामगार हित जपणारी संघटना आहे म्हणून जगातील बलाढ्य संघटना आहे असे विचार कामगार नेते सुरेश पाटील यांनीव्यक्त केले यावेळी भारतीय मजदूर संघाचे वरिष्ठ नेते रंजन कुमार, जिल्ला उपाध्यक्ष मधुकर पाटीक तालुका अध्यक्ष लंकेश म्हात्रे , जनाईन बंडा व मोठ्या सेखने महिला कामगार व पुरुष कामगार उपस्थित होते . या प्रसंगी कोरोना काळात विशेष काम करणाऱ्या कामगारांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौर्विण्यांत आले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *