ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांची जेएनपीटी बंदरास भेट

November 27, 202113:35 PM 50 0 0

उरण ( संगिता पवार ) :  केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी जवाहरलाल नेहरू बंदरास (जेएनपीटी) गुरुवार (दि. 25) नोव्हेंबर, भेट दिली. आपल्या भेटी दरम्यान श्रीमती सीतारामन यांनी बंदरातील कामकाजाची तसेच व्यापार व व्यवसाय गतिमान करण्यासाठी सीमाशुल्क विभागाद्वारे पुरविल्या जाणा-या सुविधांची माहिती घेतली. जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. व उपाध्यक्ष श्री उन्मेश शरद वाघ, भा.रा.से. यांनी मंत्री श्रीमती सीतारामन यांचे बंदरात स्वागत केले व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना दिली.

बंदरातील आपल्या दिवसभराच्या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री श्रीमती सीतारामन यांनी जेएनपीटीच्या अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाला भेट दिली व सीपीपीमध्ये फॅक्टरी सीलबंद निर्यात कंटेनरसाठी उभारण्यात येणा-या सीमाशुल्क तपासणी सुविधा केंद्राची पायाभरणी केली. याशिवाय, मंत्री महोदयांनी जेएनपीटीतील व्ह्यू-पॉइंटवरून बंदरातील सर्व टर्मिनल्स व परिसरातील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.
केंद्रीय मंत्र्यांनी बोटीतून प्रवास करताना बंदरातील सर्व टर्मिनल्सच्या कामकाजाचा व पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांना व्यापार व व्यवसाय गतिमान करण्याच्या उद्देशाने जेएनपीटी द्वारा करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *