ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण तालुक्यात मतदार नाव नोंदणी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

September 29, 202114:54 PM 8 0 0

उरण (संगिता पवार) भारत निवडणुक आयोगाने १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने दि. ३१/१०/२०२१ पर्यंत या कालावधीत नविन नोंदणी, तांत्रिक त्रुटी, मयत/दुबार/ स्थलांतर नावे कमी करणे अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जातील. तसेच दि. ०१/११/२०२१ ते ३०/११/२०२९ या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जातील


ज्या मतदारांची नावे मतदार यादीत नाही अथवा ज्यांना दि. ०१.०१.२०२९ रोजी १८ वर्ष पूर्ण झाले आहेत, अशा नविन मतदारांनी नमुना ६ भरणे आवश्यक आहे. तसेच मयत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतुन कमी करणे साठी नमुना ७ भरणे आवश्यक आहे. तसेच मतदार यादीत वय, नाव, लिंग यामध्ये दुरूस्ती असेल तर नमुना ८ भरणे आवश्यक आहे. तसेच पत्ता बदली करावयाचा असेल तर त्यांनी ८ अ भरणे आवश्यक आहे. सदर नाव नोंदणी ऑन लाईन फॉर्म भरणे करीता www.nvsp.in या पोर्टलचा वापर करता येईल व Voter Helpline App(VHA) याॲपचा वापर करता येईल, अंतिम मतदार यादी ०५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार यादीत नविन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मतदारांनी विहीत नमुण्यात अर्ज करावे असे आवाहन १९० उरण, सहा, मतदारनोंदणी अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, यांनी आवाहन केलेल आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *