ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे

September 24, 202113:16 PM 29 0 5

झाडे लावा ,झाडे जगवा ,हे घोषवाक्य आत्ता घोषवाक्य म्हणण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे .कारण अलीकडच्या काळात आपल्याला घोषवाक्य तर ऐकायला मिळतात पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होत असलेली माञ दिसुन येत नाही . आपण असे न करता वृक्ष लागवडीकडे लक्ष दिले पाहिजे .


‘वृक्ष माझा सखा’ वृक्षाला मिञ मानला पाहिजे आपला एखादा मिञ आपल्याला धोखा देऊ शकतो,पण वृक्ष मात्र कधीच नाही उलट तो आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न करता आपली मदत करत असतो. आपल्याला खाण्यासाठी गोड गोड फळे ,देवपुजेसाठी छान छान फुले अहो एवढेच नाही तर आज काल लोकांना खाली बसुन जेवायला लाज वाटते म्हणुन ज्या डायनिंग टेबलचा वापर करतात तो सुद्धा वृक्षांनी दिलेल्या लाकडांनपासून बनवलेला असतो.घरातील फर्निचर कपाट,बेड ,टेबल ,खुर्ची या वस्तू मानवाला फार गरजेच्या वाटत आहेत. माणसाला जगण्यासाठी अन्न ,वस्त्र ,निवारा या मूलभूत गरजा आहेत .त्या सुद्धा वृक्षापासूनच पुर्ण होतात .आणि त्याहुन महत्वाचं म्हणजे आपल्याला श्वास घेण्यासाठी जो आँक्सिजन लागत तो पण वृक्षापासूनच मिळतो .मानव हा पूर्णपणे वृक्षावर अवलंबुन आहे म्हणुनच झाडे लावली पाहिजे . भविष्यात आपल्याला आँक्सिजन ची कमतरता भासू नये म्हणुन प्रत्येकाने निदान एकतरी झाड लावले पाहिजे. मी ठरवलयं तुम्हीही ठरवा ….

– रेश्मा धरणीधर कोळेकर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *