ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लाखो शिवप्रेमी, दासभक्तांची प्रतिक्षा संपणार : उरणमध्ये जेएनपीटीने ३२ लाख खर्चून उभारलेले २० मीटर उंचीचे ऐतिहासिक शिवस्मारक पर्यटकांसाठी येत्या दहा दिवसातच खुले होणार !

March 28, 202214:17 PM 32 0 0

उरण ( संगिता पवार ) : रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्राची मान उचावणाऱ्या उरण येथील जेएनपीटीने ३२ कोटी खर्चून उभारलेल्या व लाखो दासभक्तांना उत्कंठा लागून राहिलेले ऐतिहासिक भव्य दिव्य २० मीटर उंचीचे शिवस्मारक पर्यटकांसाठी येत्या १० दिवसांनंतर खुले करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी वरिष्ठ प्रबंधक तथा सचिव जयंत ढवळे यांनी दिली.कोवीड काळात मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आलेले शिवस्मारक खुले करण्यात येणार असल्याने शिवप्रेमी,दासभक्तांमधुन आनंद व्यक्त केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राची शान ठरू पाहाणाऱ्या उरण येथे जेएनपीटीने उभारलेल्या शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे मेमोरियल म्युझियम शिवस्मारकाचे अडीच वर्षांपूर्वी लोकार्पण करण्यात आले आहे.विविध सुविधा असलेल्या अत्याधुनिक भव्य- दिव्य स्मारकाची मागील अडीच वर्षांपासून देशभरातील शिवप्रेमी,दासभक्त, पर्यटक आणि नागरिक आदी सर्वांनाच मोठी प्रतिक्षा लागून राहिली होती.
कोवीड काळात बंद ठेवण्यात आलेले २० मीटर उंचीचे बहुचर्चित शिवस्मारक पर्यटकांसह सर्वासाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान जेएनपीटी प्रशासनाने ३२ कोटी खर्चुन १९.३ मीटर उंचीचे भव्य शिवस्मारक नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात आले आहे. पाच मजल्यापर्यंत उभारण्यात आलेल्या तळ मजल्यावर ४८० चौरस मीटरचा भव्य बहुउद्देशीय सभागृह आहे.या सभागृहात कॅन्टीन, ग्रीनरुम आणि संग्रहालय उभारण्यात आले आहे.या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.पहिल्या मजल्यावर दोन खुल्या बाल्कनी असुन या बाल्कनीमधुन चहुबाजूंनी असलेल्या निसर्गमय परिसर न्याहाळता येणार आहे.दुसऱ्या मजल्यावर भव्य अशा एक्झीब्युशन हाॅलची निर्मिती करण्यात आली आहे.या एक्झीब्युशन हाॅलमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्र, शिल्प, पेंटिंगचे प्रदर्शन लावण्यात आली आहेत.कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या स्वांतत्रवीर सावरकरांच्या शिक्षेच्या प्रसंगाचाही अप्रतिम शिल्प उभारण्यात आले आहे.
त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर चहुबाजूंनी परिसरातील देखाव्यांची लज्जत घेण्यासाठी विह्यूज गॅलरी आणि महाराजांच्या जीवनपटावर ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. या ऑडिओ व्हिज्युअल मिनी थिएटरमध्ये प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजच्याच मागे एमपी थिएटर उभारण्यात आले आहे.या ओपन एमपी थिएटरमध्ये २५० प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
पाचव्या आणि अखेरच्या मजल्यावर सहा मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि चार मीटर उंचीचा समर्थ रामदास स्वामी यांचा अष्टधातुंचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित उभारण्यात आलेल्या या स्मारकाची तळमजल्यापासुन उंची १९.३ मीटर आहे.राज्यातील इतक्या मोठ्या उंचीचे हे एकमेव स्मारक आहे.
१७ फेब्रुवारी २०१९ रोजी या शिवस्मारकाचे उद्घघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात आणि लाखो दासभक्तांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरु पाहाणाऱ्या या ऐतिहासिक भव्य दिव्य अशा शिवस्मारकाची विशेषतः दासभक्तांना मोठी उत्कंठा लागून राहिली होती.त्याचेही स्वप्न या निमित्ताने साकार झाले आहे. मात्र कोरोनामुळे हे शिवस्मारक मागील दोन वर्षे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *