ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

झोपडपट्टीत गोदामाला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

January 3, 202213:42 PM 40 0 0

मुंबईतील घाटकोपरमधील असल्फा भागात आज सकाळी एका गोदामाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ताज्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

घाटकोपरमधील असल्फा हिमालय सोसायटीच्या झोपडपट्टीत असलेल्या गोदामाला ही आग लागल्याचे वृत्त आहे. गोदामाला लागलेली आग झोपडपट्टीपर्यंत पसरू लागल्याचे सांगण्यात आले या ठिकाणी इंजेक्शन बनवण्याचं काम सुरू होतं. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे आकाशात काळ्या धुरांचे लोट दिसत आहेत. या परिसरात मोठ्याप्रमाणवर नागरी वस्ती आहे व विविध छोट्या कंपन्या देखील आहेत. त्यामुळे अधिक सावधगिरी बाळगली जात आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *