ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

“वारी विवेकाची” तीन दिवशीय ऑनलाईन व्याख्यानमाला : महाराष्ट्र अंनिस चा अभिनव उपक्रम!

July 16, 202113:42 PM 6 0 0

महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरेतील अनेक संतानी आपल्या अभंगातून अंधश्रद्धेवर प्रहार करुन समाजात विवेकी नीतीमूल्यं रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. ही संताची पुरोगामी परंपरा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे चालवत आहे. अशा या पुरोगामी संत विचारांचा जागर करणेसाठी शुक्रवार १६ जुलै ते रविवार १८ जुलै पर्यंत ‘वारी विवेकाची’ ही तीन दिवशीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याखानमाला आयोजित केली आहे.


पहिल्या दिवशी शुक्रवार,दि. १६ जुलैला सायंकाळी ६ वाजता ह.भ.प.ॲड.देवदत्त परुळेकर, वेंगुर्ला यांचे” संत विचार आणि धर्म चिकित्सा” या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुस-या दिवशी शनिवारला १७ जुलै रोजी ह.भ.प. डॉ सुहास फडतरे महाराज, कोरेगाव, सातारा यांचे ” अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संतांचा जागर” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. तिस-या दिवशी रविवार,१८ जुलैला ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज, मुंबई यांचे ” संतविचार आणि भारतीय संविधान” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे
तीन दिवसांसाठी या वारी विवेकाची ही व्याख्यानमाला रोज संध्याकाळी सहा वाजता

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *