ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

न्हावा ग्रामस्थांना १५ दिवसात फक्त अर्धा तासच पाणी : पाणी टंचाई दूर करण्याचे आश्वासन कागदावरच : संतप्त ग्रामस्थांची सिडको भवनावरच धडक : अधिकाऱ्यांना घेराव

March 23, 202214:43 PM 30 0 0

उरण ( संगिता पवार ) : दररोज पाच तास पाणी पुरवठा करण्याचे सिडकोने दिलेले आश्वासन फोल ठरल्याने आणि १५ दिवसात फक्त अर्धा तासच पाणी मिळत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय सुमारे २५० न्हावा ग्रामस्थांनी सिडकोच्या कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घातला. न्हावा ग्रामपंचायतींची न्हावा-खाडी आणि तीन पाडे मिळून जवळपास साडेचार हजार लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या मानाने दररोज नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीची दररोज दिड लाख लिटर पाण्याची मागणी आहे.मात्र मागील काही महिन्यांपासून मागणीच्या निम्म्याहूनही कमी पाणी पुरवठा होत आहे.अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मात्र नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर येऊन ठेपली आहे.

पाणी टंचाईमुळे नागरिकांवर तलाव, विहीर आणि उपलब्ध होणाऱ्या इतर स्त्रोतचा आधार घ्यावा लागत आहे.त्यानंतरही पुरेश्या प्रमाणात नागरिकांना पाणी मिळत नाही. पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी मंत्रालयात खासदार सुनील तटकरे, आमदार महेश बालदी, कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती.त्यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्हावा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना दररोज पाच तास पाणी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.त्यानंतरही पाणी पुरवठ्याची समस्या कायमच राहिल्याने आमदारांच्या नेतृत्वाखाली सिडको भवनातही पाणी प्रश्नावर बैठक घेण्यात आली होती. याबैठकीनंतर गव्हाण-शिवाजीनगर येथील जलवाहिनीमधून ८ इंच व्यासाची नवीन जोडणी टाकण्यात आली आहे.मात्र त्यानंतरही पाण्याची समस्या सुटलेली नाही.
न्हावागाव उंचावर असल्यामुळे पाणी पंपाने साठवणूक टाकीत सोडावे लागते. त्यानंतरच नागरिकांना पाणी वितरण केले जाते.मात्र मुळातच पाणीच मिळत नसल्याने पाणी साठवून टाकीत सोडणार कुठून आणि नागरिकांना पाणी पुरवठा करणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सिडकोकडून पाणी पुरवठाच सुरळीत होत नसल्याने मात्र नागरिकांना १५ दिवसात फक्त अर्धा तासच पाणी पुरवठा होत असल्याची माहिती सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे यांनी दिली.
पाणी टंचाईचे संकट दूर करण्याच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या न्हावा ग्रामस्थांनी सोमवारी (२१) सिडको भवनावरच धडक दिली.इतक्यावरच न थांबता महिलांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना
घेराव घालून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.यावेळीही अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. या सर्व पक्षीय आंदोलनप्रसंगी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच मंजुषा ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, माजी सरपंच जागृती ठाकूर ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष शैलेश पाटील, माजी उपसरपंच किसन पाटील, ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत भोईर, महिला मंडळ अध्यक्षा मिनाक्षी पाटील,शांता म्हात्रे आणि सुमारे २५० ग्रामस्थ उपस्थित होते.यामध्ये महिलांची संख्या मोठी होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *