ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आम्ही केंद्राचे पाय पडायला तयार; पण ऑक्सिजनचा पुरवठा करा : राजेश टोपे

April 23, 202114:30 PM 32 0 0

मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यात आरोग्य आणिबाणीसारखी स्थिती झाली आहे. अशात राज्य सरकार रुग्णांना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करीत आहे. राज्यात ऑक्सिजनचा गरजेनुसार पुरवठा होत नाहीये. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘केंद्र सरकारचे पाय पडायला तयार आहे. परंतु आम्हाला ऑक्सिजन द्या’ असे म्हटले आहे.

राज्य सरकार रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न करीत आहे. परंतु राज्यातील कोरोना रुग्णांची कठीण परिस्थिती पाहता ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर तातडीने गरज आहे. आम्ही केंद्राला नम्रपूर्वक विनंती करतो की, आम्हाला ऑक्सिजन द्या, त्यासाठी आम्ही केंद्राचे पाय पडायलाही तयार आहोत’. असे राजेश टोपे य़ांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

ऑक्सिजन देण्याचा अधिकार केंद्राकडे
देशातील सर्व राज्यांना ऑक्सिजन पुरवण्याचा अधाकर केंद्र सरकारकडे आहे. महाराष्ट्र् कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे ऑक्सिजन आपल्या ठरलेल्या ठिकाणी तातडीने पोहचावा यासाटी ग्रीन कॉरिडोर तयार करावा अशी विनंती टोपे यांनी केंद्राला केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *