जालना (प्रतिनिधी) ः कोणत्या समाजाला आरक्षण मिळाव याबद्दल ओबीसी समाजाचा मुळीच आक्षेप नाही. ओबीसी समाज हा कोणत्याही जात, धर्म, पंथाविरूद्ध नसून आम्हाला केवळ आमचे आरक्षण अबाधीत ठेवायचे आहे. यासाठीच ओबीसी समाज लढा देत आहे. मात्र कोणी आमच्या आक्षणाच्या वाट्यातून वाटा मागणार असेल तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा राज्याचे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे बोलतांना दिला.
जालना येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज रविवारी ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी विशाल मोर्चाला प्रारंभ झाला.
सदर मोर्चा काद्राबाद, मस्तगड, गांधीचमन, शनिमंदीर, उड्डाणपुल, नुतन वसाहत या मार्गे जावून जांगडा पेट्रोलपंपाच्या मागील प्रारंगणात या मोर्चाचा समारोप करण्यात आला. या समारोपाच्या वेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खा. डॉ. विकास महात्मे, खा. भागवत कराड, माजी मंत्री आ. महादेव जानकर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. कैलास गोरंट्याल, आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे, आ. राजेश राठोड, आ. संजय दौड, आ. नरेंद्र दराडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आ. नारायणराव मुंढे, शिवाजीराव चोथे, रामराव वडकुते, संतोष सांबरे, प्रकाश शेंडगे, नवनाथ तायवाडे, फुलचंद कराड, बाळासाहेब सानप, प्रविण घुगे, माजी महापोर बापु घडामोडे, प्रा. सुशिलाताई मोराळे, ईश्वर बालबुधे, राहुल जाधवर आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना श्री वडेट्टीवार म्हणाले की, आजचा ओबीसी समाजाचा मोर्चा हा कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा पक्षाविरूद्ध नसून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील अठरा पगड जाती आणि ओबीसी समाजातील बहुतांशी कुटूंब आजही अर्धपोटी राहुन जीवन जगत आहे. ओबीसी आरक्षणाचा कोणाताही या समाजापर्यंत पोहचत नसल्यामुळे विकासापासून वंचित आहे. आपल्या मागण्या घेवून हा आपला आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम आपण करणार आहोत. ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाच्या हक्कासाठी लढले पाहिजे असे सांगुण श्री वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचे जेष्ठ नेते स्व. गोपीनाथराव मुंढे आणि त्यांच्यानंतर राज्याचे मंत्री छगण भुजबळ या दोन्ही नेत्यांनी ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी केलेल्या संघर्षाचा आपल्या भाषणातून गौरवपुर्ण उल्लेख केला. ओबीसी समाजाच्या हक्काच्या लढाईसाठी आपण कशाचीही पर्वा करणार नाही असे स्पष्ट करून ओबीसी समाजाची जात निहाय स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे एवढीच रास्त मागणी आमची आहे. पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आपण ही मागणी केली असून गरज पडली तर ओबीसी समाजाच्या जात निहाय जनगणनेचा प्रस्ताव आपण स्वतः निधी मंडळात मांडणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगीतले. ओबीसी समाजामध्ये सतत भांडण लावण्याच काम करून काही मंडळींनी सत्ता मिळविण्याचे प्रयत्न केले आहे. कोणत्याही समाजाला आरक्षण मिळू नये असा ओबीसी समाजाचा हेतू मुळीच नाही. परंतू आमच्या मुळावर येईल त्यांची जिरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा रोखठोक इशारा वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून दिला. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी ओबीसी मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आल्याबद्दल सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधीत राहावे यासाठी सुरू करण्यात आलेली लढाई जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत शांत बसायच नाही. जालन्यात ओबीसी मोर्चा काढून येथील ओबीसी बांधवांनी जाळ पसरवल असून त्यात कोण फसेल हे सांगता येत नाही अशी मार्मीक टिप्पनीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली. जालना येथे विशाल ओबीसी मोर्चाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संयोजन समितीमधील पदाधिकार्यांच वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून कौतूक केले. यावेळी भावना राजु सतकर या विद्यार्थीनीने ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी समाजाच्या मागण्यांचे जाहिर वाचन केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा. भगवानसिंग ढोबाळ यांनी तर शेवटी ओबीसी मोर्चा संयोजन समितीचे संयोजक राजेंद्र राख यांनी आभार मानले.
Leave a Reply