ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरेगाव तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू- गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांचे आश्वासन

August 20, 202114:58 PM 27 0 0

सातारा,(विदया सुरजकुमार निकाळजे) “कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रशासनास नेहमीच सहकार्य असते. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण देतानाच मुलांच्याकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग,लसीकरण,सर्वेक्षण या सारखी कामे प्राथमिक शिक्षकांनी प्रामाणिकपणे पार पाडली आहेत. त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन गटविकास अधिकारी श्रीमती क्रांती बोराटे यांनी दिले.


नूतन सहाय्यक गटविकास अधिकारी मा. मिलिंद मोरे साहेब यांचे कोरेगाव तालुका शिक्षक समितीच्या वतीने स्वागत व सत्कार कार्यक्रमात क्रांती बोराटे बोलत होत्या.यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोरे साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी तालुका अध्यक्ष श्री नितीन शिर्के यांनी शिक्षकांचे पगार वेळेत व्हावेत यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. तसेच इतर प्रलंबित प्रश्नही सोडवावेत अशी भूमिका मांडली. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे अभिवचन श्रीमती बोराटे व श्री मिलिंद मोरे साहेब यांनी दिले.
कार्यक्रमास सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक श्री किरण यादव, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ मुस्कान आतार, कोरेगाव तालुका शिक्षक समितीचे कार्यकारिणी सदस्य श्री नेताजी जगताप, उदय घोरपडे, सुरेश पवार,प्रकाश पोळ,सतीश ढमाळ, अकबर मुलाणी यासह शामराव वाघमोडे, अमीर आतार, सुनिल कोकरे,शामराव बोतालजी, प्रशांत काजळे,सौ. उर्मिला शिर्के यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *