ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माण शिक्षक संघाच्या वतीने नूतन गटशिक्षणाधिकारी श्री.राऊत यांचे स्वागत

March 12, 202213:04 PM 43 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नूतन गटशिक्षणाधिकारी माधव राऊत यांचे स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष व शिक्षक बँकेचे व्हा चेअरमन महेंद्र अवघडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पंचायत समिती दहिवडी येथे श्री. राऊत यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना श्री.महेंद्र अवघडे म्हणाले, शिक्षक संघाच्या १०० वर्षाच्या इतिहासात सदैव शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे झाले.शिक्षक संघाच्या व्यासपीठावर शिक्षकांच्या अनेक समस्या सुटल्या आहेत.शिक्षक बदली, समानीकरण,वैद्यकीय बिले,फरक बिले,याबरोबरच इतर सर्व प्रलंबित विषयात सहकार्य करावे.
यावेळी बोलताना श्री.राऊत म्हणाले,शिक्षक संघटनेला विश्वासात घेऊनच तालुक्यातील शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविले जातील.आपण सर्वजण मिळून विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करू या. यावेळी रामभाऊ खाडे, मोहन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
महेश माने यांनी प्रास्ताविक केले तर आभार पुंडलिक खराडे यांनी मानले. यावेळी विस्तार अधिकारी सोनाली विभूते,सुरज तुपे,हरीश गोरे,किशोर देवकर,वर्षा देवकर,अंजली कट्टे, दिलीप गंबरे,विद्याधर चव्हाण,अजिनाथ गलांडे, दत्ता खाडे, दत्तात्रय कोळी,विक्रम माने,आकाराम ओंबासे, महादेव जाधव ,रायचंद खांडेकर,यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *