ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

October 6, 202114:53 PM 5 0 0

रोहिलागड (प्रतिनिधी) शासन निर्णयाप्रमाणे तब्बल अठरा महिन्यानंतर कोव्हीडचे सर्व नियम पाळून ग्रामीण भागातील व अंशतः शहर भागातील वर्ग पाचवी ते बारावी सुरु करण्यास शासनाची मान्यता मिळाल्याने दिनांक 4 ऑक्टोबर 21 रोजी रोहिलागड केंद्रांतर्गत विविध माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा मिळून शाळा शिक्षण उत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांची विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहाने केंद्रप्रमुख शिक्षक मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे हर्ष उल्हासात स्वागत केले .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वर वाडी केंद्र रोहिलागड तालुका अंबड येथे रोहिलागड केंद्राचे केंद्रप्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे यांनी शाळा भेटीत विद्यार्थ्यांची पुष्पगुच्छ पुस्तके देवून उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील पहिल्या दिवसांच्या शाळेची मित्र-मैत्रिणी शिक्षक भेट सुसंवाद आनंद ओसंडून वाहत होता रोहिलागड केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांनी प्रारंभी शासनाच्या कोव्हीडच्या मार्गदर्शक पाळवयाच्या सुचना तत्वे सर्व शाळेत दररोज गेल्य काळजी व पाळावयाच्या नियम मास्क साॅनिटिराईज्ड थर्मल स्क्रीनिंग फिजिकल डिस्टन्स एका बाकावर एक विद्यार्थी पाण्याची बॉटल शाळा स्वच्छता शारीरिक मानसिक आरोग्य विषयक काळजी मनो जाणिवा सामाजिक जाणीव जागृती हेल्थ क्लब व इतर अनुषंगिक शासनाचे आदेशांचे व नियमांची विद्यार्थ्यांना माहिती देवून शिक्षक विद्यार्थींचे समुपदेशन करून मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक श्री विठ्ठल गीते शिक्षक श्री संभाजी शिरसाट व आशा सेविका श्रीमती नारळे अंगणवाडीसेविका परदेशी शालेय पोषण मदतनीस श्रीमती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती श्रीमंत गंगावणे यांनी यावेळी केंद्रांतर्गत रोहिलागड किनगाव चिकनगाव माहेर भायगाव देशगव्हाण किनगाववाडी कौचलवाडी निहाल सिंगवाडी व श्रीकृष्ण नगर जिजामाता माध्यमिक विद्यालय किनगाव जामुवंत विद्यालय रोहिलागड राजुरेश्वर विद्यालय चिकनगाव या शाळेचे आज सुरू झाले विद्यार्थी उपस्थितीचा आढावा घेतला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा शाळेतील वर्ग उपस्थिती बाबत उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे आढळले तसेच केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांनी शाळा सुरू करण्याबाबत शासनाच्या दिनांक 25 सप्टेंबर 21 चे शासन परिपत्रक नुसार माननीय शिक्षणाधिकारी जिप जालना यांच्या 30 सप्टेंबर 2021 व माननीय शिक्षण आयुक्त यांच्या 2 ऑक्टोबर 21 रोजी च्या शासन निर्णयातील पत्रात नमूद बाबींचे अचुक योग्य व तंतोतंत अंमलबजावणी करण्यासंदर्भात सर्व मुख्याध्यापक यांची दिनांक दोन आॅक्टोबर ला कार्यशाळा सहविचार बैठक विशेष सभा घेऊन नियमांची पालन दक्षता काळजी अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत असे सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *