ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुलगी पहायला गेले अन् लग्न लावूनच परतले! सकलेचा परिवाराचा आदर्श विवाह सोहळा

July 16, 202113:43 PM 6 0 0

जालना : येथील दैनिक रामविचारचे कार्यकारी संपादक श्री. विजय सकलेचा आणि संपादिका सौ. सुनिता सकलेचा यांचे चिरंजीव ऍड. प्रतीक जैन यांच्यासाठी मुलगी पहायला गेले अन् लग्न लावूनच परतले. या आदर्श आणि समाजातील रुढी परंपरांना फाटा देणार्‍या विवाह सोहळ्याची थोडक्यात माहिती अशी की, विजय सकलेचा यांचे चिरंजीव ऍड. प्रतीक सकलेचा यांच्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा येथील प्रकाशचंद कोचर यांची कन्या कु. पूनम हिला पाहण्यासाठी गेले होते.

मुलाला मुलगी पसंत येताच हुंडा तर नकोच नको परंतू अन्य काहीही वस्तूसुध्दा नको, असे म्हणून श्री. विजय सकलेचा आणि सौ. सुनिता सकलेचा यांनी वधू पक्षाकडे लागलीच लग्नाचा प्रस्ताव मांडला. चर्चेअंती होकार मिळताच श्री. सकलेचा यांनी वधू पक्षाला कोणत्याही खर्चाविना हा आदर्श असा विवाह सोहळा अवघ्या काही तासात पार पाडला. या विवाहासाठी वर पक्षाकडील केवळ आई- वडील, भाऊ दर्पण सकलेचा आणि आत्या शैला कुंकूलोळ आदींचीच उपस्थिती होती.
या संदर्भात बोलतांना श्री. विजय सकलेचा म्हणाले की, अशाप्रकारचे आदर्श विवाह सोहळे अनेक होतात. परंतू हा विवाह सोहळा सर्वांपेक्षा वेगळा आहे. वधू पक्षांकडून बोलावणे आल्यानंतर आम्ही काही ठरवलेले नव्हते. मात्र हुंडा घ्यायचा नाही, याचा संकल्प तर मनस्वी केलेलाच होता. आणि मुलाला मुलगी पसंत आली तर लागलीच वधू पक्षाची समंती घेऊन अशा प्रकारचा विवाह सोहळा पार पाडण्याचेही मनात होते. मग समाज, आतेष्ट काय म्हणतील याचा कोणताही विचार केला नाही. कोणी काहीही म्हणोत, मुलगी सून म्हणून आपल्या घरात येणार आहे. ती नावं ठेवणार्‌यांच्या घरात राहणार नाही. त्यामुळे कोणाला वाटेल याचा कोणताही विचार केला नाही. आणि या विवाहाशी कोरोनाचाही काही संबंध नाही. बाबी अनेक विवाह सोहळे आदर्श ठरवले जातात. अगोदरच सर्व ठरवण्यात येते आणि नंतर सोपस्कार पार पाडले जातात. मात्र आम्ही तसं केलं नाही. वधू पक्षाच्याकडून निरोप मिळाला आणि आम्ही तेथे गेल्यानंतर अगदीच ऐनवेळेला सर्व काही ठरलं. जैन समाजात अवघ्या साडेसहा तासात सर्व सोपस्कार पार पाडणारा हा देशभरातील पहिलाच विवाह सोहळा असेल, असेही ते म्हणाले.
मुलगी कु. पूनम कोचट ही सॉफ्टवेअर डेव्हलपर असून मुलगा प्रतिक हा मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टीस करत आहे. दोघेही विद्या विभूषीत असल्याचेही श्री. सकलेचा यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *