ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

इन बीगडी हुई दिमागोसे खुशीयो के है लक्के ! हम पागल ही सही हम पागल ही अच्छे ; आ.कैलास गोरंट्याल यांनी पुन्हा वेधले मेडीकल कॉलेजच्या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष

March 17, 202212:37 PM 40 0 0

जालना (प्रतिनिधी) : इन बीगडी हुई दिमागोसे खुशीयो के है लक्के! हम पागल ही सही हम पागल ही अच्छे !! असा खास शेर सादर करत आ. कैलास गोरंट्याल यांनी विधीमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात जालन्यातील प्रस्तावित मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. आ. गोरंट्याल यांनी सादर केलेल्या शेरो शायरीला सभागृहातील दोन्ही बाजुच्या सदस्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत त्यांच्या मागणीचे समर्थन केले.
मुंबई येथे विधिमंडळात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच उपरोक्त शेर सादर केला. राज्य शासनातर्फे नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात जालन्यासाठी ट्रामा केअर युनिट मंजुर करून मनोरूग्णालयासाठी 61 कोटी रूपयांचा निधी मंजुर केल्याबद्दल आ. गोरंट्याल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त करून मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न आपल्या खास शैलीत सभागृहात मांडला. ते म्हणाले की, आपण जालना येथे मेडीकल कॉलेजची मागणी करत असतांना सरकारने प्रत्यक्षात मनोरूग्णालयाला मंजुरी देवून त्यासाठी निधी देखील दिला. गेल्या दोन वर्षापासून जालना येथे मेेडीकल कॉलेज मंजुर करावे अशी आपली प्रमुख मागणी असून त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने वरिष्ठ अधिकार्‍यांचे एक पथक जालना येथे पाठवून प्रस्तावित मेडीकल कॉलेजसाठी जागा निश्‍चीत करत या पथकातील अधिकार्‍यांनी तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला. मात्र आजपर्यंत जालना येथील प्रस्तावित मेडीकल कॉलेजला राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली नाही. परभणी येथील मेडीकल कॉलेजचा कोणताही प्रस्ताव राज्य शासनाकडे प्राप्त नसतांना परभणीसाठी मेडीकल कॉलेज तातडीने मंजुर करण्यात आल्याचे सांगुन जालना येथे मेडीकल कॉलेज मंजुर झाले पाहीजे ही आपली प्रमुख मागणी असल्याचे सांगत आ. गोरंट्याल यांनी सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वेधले.
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील वाईन व बीअर संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्‍नाबाबतही आ. गोरंट्याल यांनी आपल्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला. मध्यप्रदेशमध्ये भाजपाचे सरकार असून तेथे काय चालू आहे. याचा उहापोह करत आ. गोरंट्याल म्हणाले की, मध्यप्रदेशात नगरठेका असून तेथे कॉलनीत दारू द्यायची असेल तर जीतके लोक मागतील त्यांना दारू मिळते. मध्यप्रदेशात होम परमीट असून तेथे घरात दारूच्या बारा बॉटल ठेवण्याची परवानगी असल्याचे नमुद करत महाराष्ट्रातील सरकारवर होत असलेल्या टिकेच्या संदर्भात आ. गोरंट्याल यांनी अरे हा हम हा करे तो होते है बदनाम! वो कत्ल भी करे तो चर्चा नही असा शेर सादर करून उपस्थित सदस्यांची दाद मिळवली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *