ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोव्हिड-19ची लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणं कोणती?

April 20, 202113:02 PM 70 0 0

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना आणि तरुणांना कोव्हिडच्या विषाणूची लागण होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. कोरोना व्हायरसचे नवीन स्ट्रेन, रुग्णसंख्या कमी झाल्याने मुलांनी खेळायला घराबाहेर पडणं, घरातल्या मोठ्यांची सुरू झालेली ऑफिसेस आणि त्यानिमित्ताने होणारा प्रवास या कारणांमुळे लहान मुलं वेगाने बाधित होत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसची कोणती लक्षणं आढळतात?
* पोट बिघडणं
* उलट्या होणं
* डोकेदुखी
* बेशुद्ध पडणं
* सतत चिडचिड करणं, त्रागा करणं (अगदी लहान मुलांमध्ये)
* अंगावर पुरळ येणं
* डोळे लाल होणं
* हाताच्या वा पायाच्या नखांना किंवा बोटांना निळसर झाक येणं
* ताप
* कोरडा खोकला, घसा खवखवणं
* धाप लागणं
* तोंडाची चव जाणं, वास येणं बंद होणं

कोरोनाची दुसरी लाट मुलांसाठी धोकादायक
कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जातायत. कारण या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणं सुद्धा दिसून येतायत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्यासद्धा या नव्या कोरोनाची नवी लक्षणं आहेत. हीच लक्षणं लहान मुलांसाठी घातक ठरतायत. यापूर्वीही लहान मुलांना कोरोनाची लागण होत होती, मात्र लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा असल्यामुळे ती लवकर बरी व्हायची. मात्र नव्या कोरोनाची जुलाब, उलट्या अशा प्रकारची लक्षणं ही लहान मुलासांठी धोकादायक असू शकतात असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.

कोरोनातून बरं झाल्यानंतरही लहान मुलांना धोका?
कोरोनातून पूर्णपणे बरं झाल्यानंतरही लहान मुलांना त्रास जाणवत असल्याचेही डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक मुलांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये MIS – C म्हणजे मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन ही समस्या उद्धभवताना दिसत आहे.

त्यामुळे शरीराच्या विशिष्ट भागात दुखणे, पोट बिघडणं, पोटात दुखणं, उलट्या, अंगावर पुरळ उमटणं, डोळे लाल होणं, ताप येणं, जीभ – घसा लाल होणे, असे परिणाम पाहायला मिळत आहेत. MIS – C वर तातडीने उपचार होणं गरजेचं असतं. हृदय, फुफ्फुसं, किडनी, मेंदू, डोळे, त्वचा, पोटातील आतडी या अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो. यासाठी मुलांमध्ये ही लक्षणं आढळल्यास त्यांना पूर्वी कोव्हिड होऊन गेला होता का, याविषयी डॉक्टरांना सांगणं आवश्यक आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *