ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आपल्याकडे काय आहे?

September 18, 202114:26 PM 50 0 2

चौथी चा वर्ग
चित्र पहा आणि तुमचा अनुभव लिहा.
१वणवा२पूर३भूकंप४वादळ
बराच वेळ कोणीच काही बोलेना की लिहायला सुरूवात करेना.
मी म्हटलं अरे सुरू करा लिहायला..
आणि मग समजून सांगणं गरजेचं आहे असं वाटल्यामुळे मी चित्रांकडे पाहिलं .आणि म्हटलं,अरे चार चार चित्र आहेत ,एकाही प्रसंगाचा अनुभव लिहता येत नाही का?


चला पहिले चित्र पहा ,वणवा.तुमच्या इथे कधी वणवा लागलाय का? …..नाही.
बरं ,पुढचं पाहूया…
पूर…….इथे कधी आला नाही.
(मी इथल्या स्थानिक परीस्थितीशी अवगत आहेच)
भूकंप…….
वादळ……. नाही.
बरं असो……..(मनातील खरे विचार बाजूला करून)
तुम्ही याबाबत टी.व्हि.व वर्तमानपत्रात जे पाहिलं किवा ऐकलं असेल त्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते लिहा.
आपण काही बाबतीत किती भाग्यवान असतो याची जाणीव झाली.
पण खरचं आपल्याला याची जाणीव असते का?
मुळीच नाही.
आपल्याकडे काय नाही याचाच आपण सतत विचार करून झुरतो आणि आपल्याकडे काय आहे हे विसरून जातो किवा for granted घेतो असं म्हणूया.
सुरक्षित घर,आपली म्हणावीत अशी माणसं,संपन्न प्रदेश,सलोखा असणारं वातावरण,अनेक गोष्टींचं स्वातंत्र्य,आपली निरोगी मुलं,चांगले शेजारी………….आणखी खूप मोठी list होईल.
संपूर्ण जग नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांशी झुंजत असताना आपण आपल्याकडे असलेल्या वरील सर्व गोष्टिंबाबत कृतज्ञतेची भावना ठेवायला हवीय.
कारण जगात अनेक लोकांना वरीलपैकी गोष्टी मिळत नाहीत.
मग आपल्या तक्रारी किती किरकोळ आहेत हे आपल्याला नक्कीच जाणवेल.
लेखिका -विदयाराणी यादव
सातारा(जि. प.)

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *