ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नारियलवाले कुंटूबातील व्यक्ती पोलीस विभागात कार्यरत असतांनाही अन्याय होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय -हंसराज अहिर

June 3, 202112:31 PM 107 0 0

जालना -प्रतिनिधी गवळी सामाजाबद्दल आपत्तीजनक शिवीगाळ करणे, विशिष्ट जातीला लक्ष करुन त्या समाजातील नागरिकांना, महिलांना, युवकांना बदनामच नाही तर गुन्हेगार समाज असल्याचे विधान करीत असल्याची चित्रफित तेथे उभा असलेला आपल्या बहिनीला उपचारकरीता आणले असता शिवराज नारियलवाले यांनी शिवीगाळ करतांना चित्रफीत का काढली ? या कारणावरुन शिवराज नारीयलवाले या गवळी समाजाच्या युवकास पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

निजामच्या काळात ही पोलिसांना सहकार्य करणारे गवळी समाजच होते व देशाला स्वातंत्र्य करण्याकरीता मोठा सिंहासा वाटा असून गवळी समाजाच्या 9 महिलांनी बलिदान दिले असे ही इतिहासात नोंद असून गवळी समाजातील अनेक नागरिकांनी बलिदान देऊन देशभक्तिचा संदेश दिला असे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी निवेदनाद्वारे माहिती दिले.

शिवराज नारियलवाले यांचे कुटूंब पोलीस विभागात असून त्यांचे वडिल जिल्हा परिषद शाळेत शिक्षीक म्हणून होते त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले होते व आज ते सेवानिृवत्त झालेले आहे. तसेच काका पोलीस उपअधिक्षक आहे, लहान भाऊ पोलीस हेड कॉन्स्टेबल आहे व चुलत भाऊ ही एस.आर.पी.एफ गु्रप नं. 3 मध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहे. तसेच अशा शिक्षीत व पोलीस विभागात कार्यरत असलेल्या कुटूंबातील युवकाला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे बेदम मारहाण प्रकरणी माझी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंजसराज अहिर यांच्या सोबत जालना जिल्ह्यातील गवळी समाजाचे शिष्ठमंडळाने पोलीस महानिरीक्षक यांना समकक्ष भेटून पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यंानावर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाली पाहिजे असे ही हंसराज अहिर यांनी सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिरामन अप्पा गवळी, प्रदेश उपाध्यक्ष वसंत नामा गवळी, बाबु मामा सतकर, प्रदेश सचिव प्राचार्य अशोक मंडले,कृष्णा बाचलकर, सुरेंद्र हुंडीवाले, मोहन मेघावाले, गणेश सुपारकर, ऍड. राजीव पहाडीये, जालना जिल्हाध्यक्ष सुनिल रुपा पहेलवान खरे, नंदुआप्पा परळकर, मुकेश बरैठीये, टिकाराम बरठैयी, चेतन जांगडे, घनश्याम खाकीवाले, सोमेश काबलीये, नारायण भगत, संजय फत्तेलष्करी, सुरज मेघावाले आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *