ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रिपब्लिकन पक्षाच्या मजबूतीसाठी काय करावे लागेल?

April 16, 202113:48 PM 114 0 0

भारतभूमीचे भाग्यविधाते, जागतीक मानवमुक्तीचे प्रणेते, अनंत पैलूंचे योध्दे असलेल्या प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यांतील महास्वप्न असलेल्या रिपब्लिकन विचारसरणीसाठी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाव्दारे दिलेल्या अव्दितीय लढ्याला तोड नाही. आंबेडकरी आंदोलनाचे नायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड, बँरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, बी. सी. कांबळे, दादासाहेब रूपवते यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाने निर्माण केलेला झंझावत देशाने याची देही याची डोळा अनुभवलेला आहे. समता बंधुता स्वातंञ्य न्याय ,विद्न्यानवाद, लोकशाही गणराज्यावर आधारीत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या शिलेदारांनी सर्वकष मानवमूक्ती, बौध्दमय भारत, सामाजिक आणि आर्थीक विकासाच्या दृष्टीने जे लोकलढे ऊभे केले त्याला तोड नाही. परंतू पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे या पक्षाची जी शकले ऊडाली त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागलेली आहे. परिणामी 1970 च्या दशकात दुसर्या क्रमाकांचा मोठा राजकीय पक्ष असलेला हा पक्ष आज विधीमंडळ आणि संसदीय राजकारणाच्या बाहेर फेकला गेलेला आहे. समकालीन काळात या पक्षाची अनेक शकलं ऊडालेली आहे.

महाराष्ट्रात प्रामुख्याने रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखालील एक गट आणी प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील एक गट आस्तीत्वात आहेत. हे दोन्ही गट प्रामुख्याने एकमेकांपासून अंतर राखून आहेत. या दोन गटात होत नसलेला समन्वय हे आज एक मोठं चिंतेच कारण आंबेडकरी समूहासमोर आहे. तसेच याव्यतिरीक्त प्रा. जोगेद्र कवाडे सर, अँड राजेन्द्र गवई, मनोजभाई संसारे, यांच्या नेतृत्वाखालीलही काही रिपब्लिकन पक्षाचे गट महाराष्ट्राच्या विविध भागात कार्यरत आहेत. रामदास आठवले यांचा गट तर मंञीपदासाठी सरऴच आंबेडकरी विचारांचा सामना ज्यांच्याशी आहे त्या हार्डकोअर मनुवादी पक्षांबरोबर राजकीय समझौता करून बसलेला आहे. या गटावर तत्वच्युती केल्याचा मोठा आरोप असून आंबेडकरी समाजात यांच्याबद्दल कमालीचा संताप बघायला मिळतो. तर दूसरीकडे रिपब्लिकन राजकारन हे एकजातीय असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर आणि राजकीय निराशेतून मा. प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन गट विसर्जीत करून नवीनच वंचित बहुजन आघाडीचा स्वायत्त राजकारणाचा प्रयोग विधानसभा आणि लोकसभा निवडनूकीला केला. या पक्षाला लक्षणीय मते मिळाली असली तरी एकही ऊमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे अँड. आंबेडकरांची विश्वासार्हता कमालीची कमी झालेली पाहायला मिळत आहे. तर इतर गट राजकीयदृष्ट्या प्रभावहीन असून ते इतर प्रस्थापीत पक्षाबरोबर समझौते करून बसलेले आहेत. या सर्व घडामोडीमुळे आंबेडकरी राजकारणाची कमालीची फरपट आणी घालमेल होत असून, आंबेडकरी समाजमन आज अस्वस्थता आणि खदखद आहे.

कांशीराम यांच्या बहुजन या जातीय समूहांना एकञ करून राजकारण करण्याच्या आणि सत्ता मिळविण्याच्या संकल्पनेने बौध्द आणि इतर मागासवर्गीय समूहांना आकर्षीत केल्याने रिपब्लिकन पक्ष अजूनच बँकफूटवर गेला आहे. कांशीराम यांनी एकप्रकारे रिपब्लिकन पक्षावर प्रतिक्रांतीच केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सैध्दांतीक भुमीकेशी गैरभूमीकाच त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेने आतातरी या अंतर्गत बेबनावातून झालेल्या नुकसाचा धडा घेतला पाहीजे. कारण सूर्यकुलाचा वारसा सांगणारा हा समूह आहे. देशातल्या क्रांतीचे नायकत्व याच समूहाकडे आहे. या सूर्यफूलांनी पुन्हा एकदा आपल्या घरट्याकडे परत फिरले पाहीजे. सुप्रसिध्द आंबेडकरी कवी प्रशांत वंजारे, आपल्या एका कवितेत लिहीतात की,

रिपब्लिकन एका महास्वप्न,
एक जाहीरनामा मानवमुक्तीचा,
त्यासाठी आपण काय करू शकलो,
हे काळ ठरवेल, पण आपण जपू हे स्वप्न ,
तळहातावरच्या फोडासारखं..
आणि ह्र्दयात ठेवू जीवंत ,
येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी..

असा प्रचंड आशावाद या कवितेतील वरील ओळीत दिसतो. म्हणून बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने ऊभ्या केलेल्या, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा, पिपल्स एज्युकेशन सोसायटी, या संस्था प्राणपनाने जपने, त्या वाढविने, आणि डोळ्यात तेल घालून त्यासाठी सदैव अविरत झुंजत राहणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन ठरेल, असं मला वाटतं. म्हणून आंबेडकरी समूहाने पुून्हा एकदा या संस्थाच्या ऊभारणीसाठी आणि मजबूतीसाठी फिनीक्स व्हावं, असं मला वाटतं.

– साऊल झोटे
शिलॉग, (मेघालय)
मो. नं : 8329280166

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *