जालना ( प्रतिनिधी) : मराठवाडा साहित्य परिषदेच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त राम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांच्या कविसंमेलनात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांची झालेली वाताहात, त्यांचे दु: ख यास कवींनी कवितांद्वारे वाचा फोडली. अंकुशराव टोपे महाविद्यालयात सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या कविसंमेलनात
” पिलू,, पिलू जीव सारे गुंतले गाण्यात,
संसार उघड्यावर हे दु: ख चिमणी पाखरांच.. “
सध्या शेतकऱ्यांचे हे विदारक चिञ कवी किरण राजे कोथलकर यांनी कवितेतून मांडले. सत्यभुषण अवस्थी यांनी ” भाग्याचे कोठे न जाणू घोडे आडून गेले, व्यवहारी जीवनाचे सारे नडून गेले” यातून सर्वसामान्यांच्या जगण्याची धडपड मांडली. ” बब्या ” कवितेतून पोरग साहेब झाल्यावर आडाणी आईच्या आनंद भावना प्रकट केल्या. राञी घिरट्या घालून दिवसा झाडास लटकलेल्या वटवाघळे या उपमेद्वारे माणसांच्या आयुष्यात पावला- पावलावर येणाऱ्या अनुभूतींची मांडणी शशिकांत पाटील यांनी केली. ” जीव धाऱ्या बरं नाही अशी झोपलेली बाधा पिंगा मनात घालते वेडी कवितेची राधा” ही प्रेम कविता डॉ. प्रभाकर शेळके यांनी सादर करताच रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.
कवीता पालापाचोळ्यात सापडत नसून स्वतः मध्ये भिनलेले विष असल्याचे सांगत काव्य निर्मीती च्या कळा कैलास भाले यांनी मांडल्या.
डॉ ज्योती धर्माधिकारी यांनी ” नित्य नव्या पाऊलात शोधतात अनवट वाटा ” यातून नाविण्याचा शोध घेण्याची प्रेरणा दिली.
लक्ष्मीकांत दाभाडकर यांनी वाञटिकांतून वातावरण खुसखुशीत केले. रमाकांत कुलकर्णी यांनी “असं कसं झालं बाबा गंगामायन अंधा ऱ्यारातीच पाण्यामंदी नेलं” या रचनेतून पुरग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. सुरेखा मत्सावर यांच्या देणेघेणे कोणाला चूकत नाही ” कवितेतून जीवनाचा हिशोब मांडला. कृष्णा आर्दड यांनी प्रेयसीचे वर्णन, दिव्या मिसाळ हिने माणसांतील प्रतिमांचा फरक, श्रीकांत गायकवाड यांनी डाव हरल्यानंतर होणारा आनंद अन् मनातील घालमेल मांडली. अध्यक्ष राम गायकवाड यांनी माणसा- माणसांत झालेल्या भेदांचे मुळ मांडत माणूस म्हणून पहावयास अजूनही हवे ” असा मानवतेचा संदेश देणारी कविता सादर केली.
राजाराम जाधव, जीजा वाघ, भीमराव सपकाळ, मनिष पाटील, गोवर्धन मुळक, बाबा तरवटे यांनी रचना सादर केल्या. प्रा. डॉ. सुहास सदाव्रते यांनी अधून-मधून कवितांची पेरणी करत बहारदार सुञसंचालन केले. तर मसाप चे सचिव पंडित तडेगांवकर यांनी आभार मानले. या वेळी रमेश पाटील गव्हाड,डॉ. संजीवनी तडेगांवकर, डॉ. राजेश शेळके, डॉ.रामदास वैद्य, डॉ. संभाजी पाटील, प्रा. पांडुरंग खोजे, बाबा तरवटे यांच्या सह रसिकांची उपस्थिती होती.
Leave a Reply