संगिता ढेरे । हिरकणी टीम
रायगड ः राज्यात गेल्या काही दिवसापासून महिलांसाठी असुरक्षीत वातावरण निर्माण झाले आहे. महिला असुरक्षीत असतांना त्यावर ठोस उपाय योजना न करता त्यावर केवळ राजकारण केलं जाऊ लागले. अशा परिस्थितीत नवरात्री महोत्सव आला असतांना नवदुर्गा कशा शांत बसतील? त्यामुळे दर्गा स्थापनेच्या दुसर्याच दिवसी चक्क नवदुर्गांनी थेट राजभवन गाठले आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडला. जर सरकारला महिलांची सुरक्षा करता येत नसेल आणि महिला आयोगाला अध्यक्ष देता येत नसेल तर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत असे ठणकाऊन सांगीतले व तशा आशयाचे एक निवेदनही राज्यपाल यांना दिले. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न लवकरच सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष विद्या गडाख, विभागीय अध्यक्ष वैशाली डोंगरे, मुंबई अध्यक्ष अंजली भोसले, मुंबई उपाध्यक्ष गीतांजली टेमगिरे, पुणे जिल्हाध्यक्ष एकता देशमुख, संघटक सुरेखा कोल्हे विभागीय कार्याध्यक्ष संगीता पाटील, नाशिक संघटक कल्याणी वाघ, उपाध्यक्ष संगीता ढेरे या नवदुर्गांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली असून राज्यातील गंभीर परिस्थिती आणि महिला संमस्यांना पाडाच वाचला.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा माधुरी भदाणे म्हणाल्या की, राज्यात सध्या महिला आयोगाला अध्यक्षच नाहीत. दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही केवळ अंतर्गत वादामुळे हे पद रिक्त आहे. सरकारला त्या पदावर कोणाची नियुक्ती करता येत नसेल तर एक निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून राज्यभरातील संघटनांचा सर्व्हे करावा आणि सक्षम संघटनेवर ही जबाबदारी सोपवावी. बलात्कारासारख्या गंभीर घटना होऊ नयेत यासाठी शक्ती कायदा अस्तित्वात आला, पण तो अजूनही नियम पोटनियम या गोंधळात अडकून पडला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना धाक उरलेला नाही. बलात्कारासारख्या घटनांवर अंकुश ठेवायचा असेल तर शक्ती कायद्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे तातडीने या कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी माधुरी भदाणे, विद्या गडाख, वैशाली डुंबरे यांनी यावेळी राज्यपालांकडे केली
यावेळी जिजाऊ ब्रिगेड तर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा शाल, जिजाऊ प्रतिमा आणि अधिवेशन विशेषांक देत सन्मान करण्यात आला. तसेच 12 जानेवारी रोजी जिजाऊंची जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा या ठिकाणी होणार्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले.
Leave a Reply