मुख्यत्वे करून कोणताही गुन्हा असो सर्वसामान्य व्यक्ती,प्रतीष्ठीत व्यक्ती किंवा कोणताही व्यक्ती असो त्याची सजा एकच असायला पाहिजे जी सर्वसामान्यांना मिळते.त्यामुळे आर्यने गुन्हा केला असेल तर तो गुन्हाच म्हणावा लागेल.गुन्ह्यांचे अनेक प्रकार असतात.त्यामुळे गुन्हेगारांनी व त्यांच्या संबंधितांनी गुन्ह्याला चालना न देता संपूर्ण चौकशीला सामोर जाने गरजेचे आहे.आर्यन खान हा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान(बॉलिवूड किंग)यांचा मुलगा आहे.त्याचप्रमाणे शाहरुख खान यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीमुळे जग प्रसीध्द आहे.परंतु दुर्देवाची गोष्ट म्हणजे शाहरुख खानचा मुलगा क्रुझ ड्रग्स पार्टीमध्ये सामील झाल्याने मिडीयात मोठी चर्चा सुरू आहे.ड्रग्सचा गुन्हा हा गंभीर गुन्हा आहे. कारण खुल्या बाजारात ड्रग्सच्या खरेदी-विक्रीवर पुर्णत: बंदी आहे.अनेक बॉलिवूड कलाकार आर्यनच्या मदतीला धावून आले व एनसीबीच्या कारवाईवर प्रश्र्न चिन्ह उपस्थित करीत आहे.परंतु एनसीबी ही सरकारी यंत्रणा आहे.त्यामुळे त्यांच्या कामात कोणीही बाधा निर्माण करू नये.कारण जेव्हा ड्रग्सची चर्चा होते तेव्हा हेही लक्षात ठेवले पाहिजे की यामध्ये देशातील किंवा जागतिक स्तरावरील मोठमोठे गुन्हेगार अवश्य सहभागी असावेत.त्यामुळे क्रुझ ड्रग्स पार्टीला हलक्यावर घेता येणार नाही.कारण आता आर्यनच्या अटकेमुळे चर्चेत आलेल्या कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्स पार्टीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शनही समोर येत आहे.म्हणजे हा गुन्हा छोटा नसुन मोठा आहे.ड्रग्स पार्टीमध्ये ड्रग्सची मागणी करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केल्याचे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) केलेल्या प्रार्थमिक तपासातून समोर आले आहे.ड्रग्स पार्टीची व्याप्ती पहाता एनसीबी ने गुजरात, पंजाब, हरयाणा,मध्यप्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यात ड्रग्सबद्दलची चौकशी वाढवीली आहे.एनसीबीने आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे.यात सर्वांना 11 ऑक्टोबर पर्यंत एनसीबीची कोठडी सुनावण्यात आली आहे.अटक केलेल्यांकडून 54.3 ग्रॅम मेफोडीन,2.5 ग्रॅम एस्टेसी,चरस, हायड्रोपोनिक विड्स तसेच गांजा जप्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.यावरून स्पष्ट होते की यात ड्रग्स माफीया अवश्य सहभागी असावेत.
मागील वर्षांपासून बॉलिवूड क्षेत्र ड्रग्स रॅकेटमध्ये गुरफटतांना दीसत आहे.रिया चक्रवर्ती व तीचा भाऊ,भारतीसिंग यांच्या ड्रग्स कनेक्शनमुळे बॉलिवूड क्षेत्रात मोठी तारांबळ उडाली होती व अनेक दिग्गज नशेच्या आदीन गेले आहे ही बाब 135 कोटी जनतेच्या लक्षात आली आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनता बॉलिवूड क्षेत्रावर नाराजसुध्दा असल्याचे दिसून येते.आर्यन खान बद्दल सहानुभूती दाखविणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आर्यन लहान मुलगा नसुन 23 वर्षाचा आहे.ज्याठीकाणी अती पैसा आला त्याठिकाणी अशा घटना नेहमीच घडतात यात दुमत नाही.आर्यने हे लक्षात ठेवायला पाहिजे होते की आपल्या वडिलांची बॉलिवूड क्षेत्रात कीती मोठे नाव कमवीले ज्याला आपण बॉलिवूड किंग म्हणतो.परंतु आर्यने नशेच्या आहारी जाऊन शाहरुख खान यांच्या कारकिर्दीवर व किंग या शब्दाला धब्बा लावलेला आहे.हीबाब सत्य आहे की आर्यन शाहरुख खान यांचा मुलगा असल्यामुळे क्रुझ ड्रग्स पार्टी मिडियाच्या माध्यमातून चर्चेमध्ये आली.त्यामुळे हेसुध्दा लक्षात ठेवले पाहिजे की 135 कोटी जनतेने शाहरुख खानला चांगल्या कामाची पावती देवून बॉलिवूड किंग बनवून जगप्रसिद्ध केले.त्यामुळे चांगल्या कामामध्ये सुईच्या टोकाएवढे जहर जरी मिसळले असेल तर ते विष इतरत्र पसरायला थोडासाही वेळ लागत नाही.त्यामुळे आर्यनवर चुकीचे आरोप लावुन शाहरुख खानला बदनाम करीत आहे असे जर कोणी म्हणत असेल तर ते संपूर्ण चुकीचे आहे.एनसीबी आपली संपूर्ण कारवाई कायद्याच्या चौकटीतून करीत आहे.त्यामुळेत या चौकशीत कोणीही बाधा निर्माण करू नये.कारण एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) यांचे मुख्य काम अवैध ड्रग्स तस्करी रोखने असते.आर्यनला कल्पणा होती ड्रग्स पार्टी जर जमिनीवर झाली तर आपण पकडल्या जावु शकतो.त्यामुळेच त्यांनी ड्रग्स पार्टीसाठी क्रुझ निवडले असावे.या क्रुझमध्ये सर्वसामान्य व्यक्ती प्रवास करीत नाही.कारण हे क्रुझ बोट महागडे आहे.ही बोट मुंबई ते गोवा चालत असते.आर्यनला माहीत असावे की एकदा बोट समुद्रात गेली की आपण झालो बादशहा.परंतु ड्रग्स पार्टी क्रुझ बोटवर होणार याचा सुगावा एनसीबीला लागला व धाडीची जय्यत तयारी केली व एनसीबीचे अधिकारी प्रवासी बनुन या क्रुझवर गेले आणि ड्रग्स पार्टीचा भांडाफोड केला.ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे व ही बाब सिद्ध करून दाखविली की बॉलिवूड क्षेत्रातील अनेक मोठमोठी हस्ती यात सहभागी राहु शकते.त्यामुळे एनसीबी अधिकारी श्री समीर वानखेडे यांना माझा सलाम.कारण त्यांचे हे देशहीताचे काम वाखाणण्याजोगे आहे.ड्रग्सच्या या प्रकरणात (एनसीबीला)नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोला मुंबई पोलिस विभागाने संपूर्णपने सहकार्य करण्याची गरज आहे.यामुळे गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी मोठी मदत होईल व महाराष्ट्रात होत असलेल्या गुन्हेवर शिकंजा असता येईल.मी बॉलिवूड क्षेत्राला विनंती करतो की आपण चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक, बंधुत्व, संस्कृती, गुन्हेगारांच्या विरोधात आवाज उठवीने, न्यायव्यवस्थेचे पालन करणे इत्यादी अनेक गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करतात.परंतु प्रत्येक्षात मात्र 50 टक्के बॉलिवूड क्षेत्र नशेच्या आहारी गेल्याचे दिसून येते.त्यामुळे बॉलिवूड क्षेत्रातील कलाकारांनी संपूर्ण नशेली वस्तुपासुन दुर राहीलेले बरे.त्याचप्रमाणे बॉलिवूड क्षेत्रातील कलाकारांनी कमवीलेला पैसा वाममार्गाकडे न नेता चांगल्या कामासाठी उपयोगात आणुन समाजकार्य केले पाहिजे.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार.
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.
Leave a Reply