जालना (प्रतिनिधी): काँग्रेस पक्ष धर्मर्निपेक्ष आणि लोकशाही मानणारा आहे. या पक्षामध्ये सर्व जाती-धर्मांना समान न्याय मिळालेला आहे. जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागळात पोहचवून सर्वसमावेशक जातीच्या लोकांना बुथ कमिटी तयार करतांना संधी द्यावी असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. जालना शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार रोजी आ. गोरंट्याल यांच्या प्रितिसुधाजी नगर आयोजीत बैठकीत ते बोलत होते. यावेळी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्री गोरंटयाल म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिकेच्या निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांनी पक्षाची मजबुत बांधनी करणे म्हणून बुथ कमिटी तयार करतांना सर्वसमावेशक घटकांना सोबत घेवून सक्रीय कार्यकर्त्यांना संधी द्यावी, काँग्रेस पक्षाने जालना नगर पालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासात मोठी भर टाकलेली आहे आणि विविध योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे विकास कामे शक्य झाली आहेत. येत्या काळात शहरातील उर्वरित विकास कामे आणि शहरातील मुख्य रस्ते करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत ही कामे लवकरच सुरू करण्यात येतील अशी ग्वाही आ. गोरंट्याल यांनी यावेळी दिली.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख बैठकीत बोलतांना म्हणाले की, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी मुंबई येथे बैठक घेवून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेतलेला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पाहता 15 ऑगस्ट पर्यंत बुथ कमिट्या तयार झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठीने व्यक्त केल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी बुथ कमिट्या तयार करण्यासाठी अग्रेसर राहावे असे आवाहन श्री देशमुख यांनी यावेळी केले.
बैठकीचे प्रस्ताविक करतांना जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद म्हणाले की, नगरसेवक आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीच्या आता बुथ कमिटया तयार करणे गरजेचे असून प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन होईल याची दखल काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी असे श्री शेख यांनी सांगीतले. यावेळी बुथ कमिटीच्या नमुना अर्जाचे आ. कैलास गोरंट्याल आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याहस्ते बैठकीत वितरण करण्यात आले. या बैठकीत जालना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा सरचिटणीस राम सावंत, चंद्रकांत रत्नपारखे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा शितलताई तनपूरे, जिल्हा काँग्रेस सफाई कामगाराच्या अध्यक्षा नंदाताई पवार, नगरसेवक जीवन सले, संजय भगत, रमेश गौरक्षक, सय्यद अजहर, शेख शकील, राजेंद्र वाघमारे, अरूण मगरे, विनोद रत्नपारखे, विष्णू वाघमारे, जगदीश भरतीया, सय्यद करीम बिल्डर, अंजेभाऊ चव्हाण, कृष्णा पडूळ, दत्ता शिंदे, नारायण वाढेकर, मनोहर उघडे, फकीरा वाघ, असलम कुरेशी, शमीम कुरेशी, नदीम पहेलवान, मंदा पवार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply