ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मोरा सागरी पोलीस ठाण्यातील लोकसेवकांस लाच घेतांना रंगे हात पकडले

March 17, 202212:30 PM 33 0 0

उरण ( संगिता पवार ) : उरण तालुक्यातील मोरा सागरी पोलीस ठाण्यातील लोकसेवक सागर संजय पवार ( वय २९ )याने फिर्यादी कडून लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई यांनी रंगेहात पकडले . मोरा कोळीवाडा येथे राहणारे तक्रारदार यांच्या विरुद्ध मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर ३ /२०२२ भादवी कलम सी प्रमाणे बुधवार (दि. ९ )मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता .सदर गुन्हयात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी मोरा सागरी पोलीस ठाण्यातील लोकसेवक यांनी वीस हजार रुपयाची मागणी केली होती . या बाबत तक्रारदार यांनी नवीमुंबई येथील अे. सी .बी .कार्यालयात तक्रार दाखल केली .
मंगळवार(दि.१५ )मार्च रोजी शासकीय पंचासमक्ष केलेल्या लाचेच्या सत्यता सत्यता पडताळावी कारवाई दरम्यान, लोकसेवक यांनी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून तक्रारदार यांच्या कडे त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यातील पुरावा मजबूत न करण्यासाठी विस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड अंती दहा रुपये स्विकारण्याचे कबुल करून नवीमुंबई येथील अे. सी .बी कार्यालया कडून सापळा रचून मोरा येथल साई बाबा मंदिर जवळील रस्तावर लोकसेवक यांची असलेली होंडा सिटी कार नंबर एम एच ४३ एक्स ४५२१ मध्ये तक्रारदार यांच्या कडून दहा हजार स्वीकारले असता लोकसेवक यांना दुपारी ४ .४१ वाजता रंगे हात पकडले .लोकसेवक यांना ताब्यात घेतले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *