ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोण आहे ती लेडी सिंघम ? जी महाराष्ट्रात ठरली द रिअल हिरो….

December 18, 202019:38 PM 194 0 0

भारतीय संविधानात जी  स्त्रि-पुरुष समानता  मांडली आहे ती प्रत्यक्षात असली पाहिजे. तोच खर्‍या अर्थाने स्त्रीचा सन्मान असेल. महिला व मुलींसाठी संदेश –  प्राऊड टु बी वुमन  जगाला वुमन पावर (स्त्रिशक्ती) काय आहे हे दाखवण्यासाठी सज्ज व्हा ! असा संदेश देणार्‍या लेडी सिंघम आणि कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी नालंदा लांडगे यांचा वृत्तांत

पद, पैसा, प्रतिष्ठा सारं काही असतांना साधेपणाने जनसेवा करणे आणि सर्वसामान्याच्या न्यायहक्कासाठी सदैव खंबीरपणे उभा राहणे तसेच एक मुलगी असतांना मुलगी म्हणून न वागता मुलाप्रमाणे डेअरींग आणि रुबाबाने वागणार्या, राहणार्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली आणि दामीनी पथकाच्या प्रमुख जबाबदारीसह पोलीस ठाण्यातील महत्वाच्या जबाबदार्या ज्यांनी पार पाडल्या अशा दबंग महिला पोलीस अधिकारी तसेच जातील तीथे महिलांच्या समस्या सोडविणे व त्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहणार्या लेडी सिंघम म्हणजेच नालंदा सुंदरराव लांडगे होय !

त्यांचा जन्म बीड जिल्ह्यात झालेला असून त्यांनी त्यांचे शिक्षण हे बीड मध्येच पुर्ण केलं. शिक्षणाची आवड आणि मेहनत करण्याची तयारी तसेच शालेय स्तरापासूनच काहीतरी करण्याची जिद्द मनात होती. नालंदा लांडगे या शालेय जिवनात 9 वी मध्ये एमसीसीच्या कॅप्टन असतांना खाकी ड्रेस परिधान करुन सराव करतांना त्यांच्या खेळाचे शिक्षक नालंदा ही किरण बेदीसारखीच दिसते, असे म्हणत. त्यानंतर नालंदा लांडगे यांनी किरण बेदी कोण आहेत, या बाबत शोधाशोध केली असता त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी असल्याचे कळाले. त्यानंतर त्यांनी किरण बेदी यांचे पुस्तक वाचले आणि तेंव्हापासून युनिफॉर्मची आवड निर्माण झाली.
तेंव्हापासूनच किरण बेदी यांना आयकॉन मानुन त्यांच्यासारखे बनन्याचे स्वप्न पाहिले आणि ते पुर्ण केले. पहिली ते पदवीपर्यंत खेळात आणि अभ्यासात अव्वल असणार्‍या नालंदा लांडगे यांच्यात वडीलाकडून खेळाडू वृत्तीचे गुण आले. त्यांचे शिक्षण बी टेक (फुड सायन्स), एम. ए. सायकॉलॉजी झालेले असून डिप्लोमा इन योगा कोर्सही त्यांनी पुर्ण केला आहे. शिवाय त्या चांगल्या कराटे प्लेअर देखील आहेत.

वाचन, बाईक राईडींग, नैसर्गिक फोटोग्राफी करणे, म्युझीक ऐकणे, कॉईन जमा करणे, पेपर कटींग ट्रॅकींग करणे आदी छंद त्यांनी जोपासले. छंद जोपासत असतांना त्या अभ्यासात देखील पुढेच होत्या. एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार असेल तर तो खेळात नसतो आणि एखादा विद्यार्थी खेळात हुशार असेल तर तो अभ्यासात नसतो असे समजले जाते परंतु त्यांच्या आभासी स्वप्नांना धुळ चारत नालंदा लांडगे यांनी अभ्यास आणि खेळ या दोन्हीत हुशार असल्याचे सिध्द करुन दाखवले. त्यांनी एमपीएससीची प्रि परिक्षा ही पदवी अभ्यासक्रम पुर्ण करीत असतांनाच दिली, त्यांत त्यांना यश आले. एमपीएससी परिक्षेच्या पहिल्या प्रयत्नातच त्यांनी यशाचे शिखर गाठले. नाशिक येथे पोलीस दलाचे नाशिक येथे प्रशिक्षण पुर्ण करुन त्या 2011 मध्ये पोलीस दलात रुजु झाल्या आणि सेवा देण्यास सुरुवात केली. त्यांना पुणे शहर पोलीस दलात सन 2011 मध्ये पहिली पोस्टींग मिळाली. 2011 ते 2014 पर्यंत पुणे शहरात पोलीस सब दंस्पेक्टर म्हणून चांगले काम केल्यानंतर पदोन्नतीने त्यांची बदली जालना जिल्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून झाली.
त्यानंतर त्यांना जालना शहरातील कदीम पोलस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली.

जालना येथे कार्यरत असतांना त्यांना दामीनी पथक जालना जिल्हा इंचार्ज म्हणून नियुक्त करण्यात आले. या पथकात काम करीत असतांना त्यांनी जालना जिल्हा पिंजुन काढला, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड यासह ज्या ज्या ठिकाणी शाळा, कॉलेजमधील मुलींना रोड रोमीओ त्रास देत असतील त्या भागात जाऊन मुलींना संरक्षण दिले. त्रास देणार्‍या मुलांना चांगलाच धडा शिकवून त्यांच्याकडून भविष्यात कोणत्याही मुलींना किंवा महिलांना त्रास दिला जाणार नाही याचा कायमचा बंदोबस्त केला. त्या जिल्ह्यात कार्यरत असतांना कोणत्याही विद्यार्थीनीला त्रास झाला नाही, जिथे महिला किंवा मुलीची तक्रार प्राप्त झाली तिथे जाऊन त्यांनी तक्रारीचे निर्मुलन केले. त्यामुळे त्यांना जालना लेडी सिंघम म्हणून ओळखू लागले. प्रत्येक महिला आणि मुलींकडे त्यांचा मोबाईल नंबर होता आणि अजुनही आहे. दामीनी पथक म्हटले की, नालंदा लांडगे यांचेच नाव डोळ्यासमोर येतं. त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात जाऊन मुलींचे मनोधैर्य वाढवले आणि त्यांना मार्गदर्शन केले. किरण बेदी यांना आयकॉन माणनार्‍या नालंदा लांडगे याच जिल्ह्यातील मुलींच्या आयकॉन कधी झाल्या कळालेच नाही. नालंदा लांडगे या जिल्ह्यातील मुलींच्या आणि महिलांच्या गळ्यातले ताईत बनल्या होत्या. कारण कोणत्याही वेळेला मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्वभाव होता आणि अजुनही आहेच. त्या जातील तीथे कामाच्या माध्यमातुन त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण करीत असतात. शक्यतो मोठ्या पदावर गेल्यानंतर अनेकजन आपल्या गुरुजनांना विसरुन जातात मात्र त्या अजुनही त्यांच्या गुरुचे नाव घेत त्यांनी केेलेल्या मार्गदर्शनामुळे आपण काहीतरी करु शकलो असे त्या सांगत असतात. नालंदा लांडगे या त्यांच्या यशाचे श्रेय स्वतःच्या मेहनतीला तसेच वडील सुंदरराव लांडगे(इंजिनिअर, बीड), त्यांचे शिक्षक राऊत सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांना देतात. अशा या जाणीव असलेल्या महिला पोलीस अधिकार्यांना सलामच !

सामाजीक कार्य

त्यांनी वेळोवेळी सामाजीक कार्यात रुची दाखवली आहे. अनेकवेळा रक्तदान केल्यामुळे त्यांना लाईफटाईम ब्लड डोनरचे कार्ड प्रदान करण्यात आले आहे. अत्यंत बीकट काळात त्यांनी गरीबांना मदतीचा हात नेहमीच पुढे केला आहे. गोरगरीब मुलांना वस्तीवर जाऊन मदत करणे, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे यासह अनेक सामाजीक उपक्रमात देखील त्यांनी सहभाग नोंदविला आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेकांनी अनुभवला खाकीतला माणूस

लॉकडॉऊनच्या काळात सिल्लोड येथे कार्यरत असतांना सलग 4 महिने बंदोबस्त ठिकाणाहून जाणार्‍या बेघर, वेडस आणि अपंग असणार्‍या व्यक्तींना त्या त्यांच्या फुड पॅकेट मधून नेहमीसाठी अन्न आणि चहापणी देत होत्या. तसेच कवी-साहित्य ग्रुपच्या सोबत फिरुन गरज असणार्‍या गोरगरीब कुटुंबांना शोधून त्यांच्या घरी जाऊन अन्नधान्य कीट वाटप केल्या, व्यापारी कुटुंबांने स्वखर्चाने गोरगरीब कुटुंबास धान्य, भाजीपाला कीट वाटप केल्या, त्यांच्या सोबतही नालंदा लांडगे यांनी हिरीरीने सहभाग घेतला.

सामाजीक उपक्रमात सहभाग

जालन्यात असतांना त्यांनी आवडीने सामाजीक उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. जालना जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त गेल्या 35 वर्षाहुन अधिक काळापासून अविरत सुरु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे 2018 मध्ये तर जयभीम कवी संम्मेलन 2019 चे अध्यक्षपद भुषवीले. विविध शाळा, कॉलेज मध्ये वार्षीक स्नेह संमेलन कार्यक्रमात प्रमुख अतिथीचे स्थान भुषवीले आणि विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले.

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सातत्य, परिश्रम आणि जिद्द असावी लागते – नालंदा लांडगे

आयुष्यात अनेक संकटं आणि समस्या येत असतात. परंतु त्याला जास्त महत्व द्यायला नको, प्रत्येक संकट आणि समस्यांचा सामना करुन त्यावर मार्ग काढणे आपले कर्तव्य आणि जिम्मेदारी आहे. असा मार्ग काढणार्याला यश संपादन करणे अवघड नाही. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सातत्य, परिश्रम आणि जिद्द असावी लागते असे प्रतिपादन नालंदा लांडगे यांनी साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी सोबत बोलतांना व्यक्त केले.

पोलीस दलात येण्यासाठी मी स्वतःच अत्मप्रेरीत होते. मला सर्वजन किरण बेदीसारची दिसते असे म्हणत होते आणि म्हणतात, मला माझे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्वात जास्त माझ्या वडीलांनी सपोर्ट केला. मला माझ्या मना प्रमाणे वागण्याचे राहण्याचे, खाण्याचे, शिकण्याचे आणि करीअर निवडण्याचे संपुर्ण स्वातंत्र्य माझ्या वडीलांनी दिले. त्यामुळे विरोधाचा प्रश्नच उद्भवत नाही. मी माझ्या मनाप्रमाणे जगू शकते आणि जगते. पुणे शहरात असतांना चौकी इनचार्ज म्हणून काम करतांना सर्व प्रकारचे गुन्ह्यांचा तपास व बंदोबस्त, ट्रेनिंग, नाईट राऊंडच्या जाबबदार्या सांभाळल्या. महिला म्हणून मी कधी ड्युटी नाकारली नाही, वरिष्ठांनी जी ड्युटी दिली ती स्वीकारुन जबाबदारीने पुर्ण केली. जालना जिल्ह्यात कदीम पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना महिला व बालकांवरील अत्याचाराचे सर्व गुन्ह्यांचा सखोल आणि योग्य तपास करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते. पोलीस दलात काम करीत असतांना रोजच कडू गोड अनुभव येत असतात. ज्यांना एमपीएससी ची तयारी करायची आहे त्यांनी अभ्यासात सातत्य ठवेल पाहीजे. जिवनात अनेक संघर्ष आहेत असे म्हणन्यापेक्षा जिवनच एक संघर्ष आहे असे मी म्हणेन.

त्यामुळे तरुणांनी मोठी स्वप्ने आणि ध्येय ठेवले पाहीजे. ते मिळविण्यासाठी सकारात्मकपणे स्वतःला झोकुन दिले पाहीजे. महिलांनी स्वतःला कधीच अबला समजु नये, खरं तर त्यांच्यात जग बदलन्याची ताकद आहे. त्यांनी ठरवले तर काहीही होऊ शकते. महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन त्यांच्यात आत्मविश्वास वाढवला व नारी सबसे भारी याची जाणीव करुन दिली. व ही जाणीव राष्ट्रीय महिला आयोग मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात करुन दिली तसेच विविध कार्यशाळेत देखील प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. जर महिला किंवा मुलींना त्यांच्या आत्मसन्मानासाठी व यशस्वी होण्यासाठी लागेल ते मार्गदर्शन व मदत करण्यासाठी मी कायम तयार आहे. शेवटी एकच सांगेन जिंदगी हर कदम एक नयी जंग है ! त्यामुळे ही जंग तर रोजच राहणार आहे. फक्त ती जंग कशी जिंकतो यावर आपले लौकीक अवलंबुन आहे.

सन्मान आणि पुरस्कार

1. कर्तबगार महिला अधिकारी म्हणून सन्मान.
2. स्वयंसिध्दा महिला पुरस्कार(पोलीस विभाग) 2018
3. महाराष्ट्र नारीरत्न पुरस्कार 2019
4. प्रेमळताई पुरस्कार, सिल्लोड
5. माणूसकी रुग्णसेवा समुह व सुलक्ष्मी सेवाभावी संस्था औरंगाबाद यांचे मार्फत समाजकार्या बाबत पुरस्कार.
6. रोटरी क्लब ऑफ जालना चा होनररी मेंबरशिप 2018
7. पाचव्या जालना मॅरेथॉन मधे 5 किमी स्पर्धेत सहभाग
8. दौडेगा भारत, दौडेगा जालना मॅरेथॉन मधे 10 किमी स्पर्धे मध्ये सहभाग
9. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे कळसूबाई शिखर पहिल्याच प्रयत्नात सर केले.
10. रनिंग मध्ये विद्यापीठ चॅम्पीयन (सलग 4 वर्ष) 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर 1500 मीटर
11. खो खो मध्ये शालेय, जिल्हा, विभाग, राज्य, ऑल इंडीया, नॅशनल विद्यापीठ खेळाडू.
12. एम पी एस सी मार्फत पहिल्याच प्रयत्नात पीएसआय म्हणून निवड.
13. नारी सबसे भारी

Categories: यशोगाथा
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *