अच्युत मोरे : जालना – बिंधास्त फिरणे, तोंडाला न मास्क बांधता मोठ मोठ्याने गप्पा मारीत गाड्या सुसाट पळवणे, मास्क आणि सॅनीटायझरचा वापर न करता राजेशाही थाटात भाजीपला विक्रेते, दुकानदार यासह पुर्ण बाजारपेठेतील व्यवसायीक आपला व्यवसाय करीत असल्याचे पाहुन देखील, न पाहील्यासारखं करणारे नगर पालीका, महसुल आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी – कर्मचारी यांच्यामुळेच कोरोनाच्या रुग्णसंख्येत झापट्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. माझ्यामुळे काही होत नाही असे बोलणारे आणि कोरोनाचं खापर दुसर्यारच फोडणारे शोधण्याची गरज आहे. त्यामुळे कोण ओकतंय विषाणुचं जहर…? हे शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलने अत्यंत गरजेचे आहे.
जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे काहींच्या पायाखालची जमीन सरकली आहे तर काहीजन सरकारवर ताशेरे ओढून कोणालाही पॉझीटीव्ह दाखवत असल्याची चर्चा चवीने करीत आहेत. कोणी या आजाराची टींगल उडवत आहे तर काही जन नरक यातना भोगत आहे. कोरोनाचं संकट खरं आहे की खोटं हे ठरवण्याच्या नादान सर्वसामांन्याच्या हातची भाकरी मात्र हिरावली हे मात्र नक्की. कागदोपत्री आवाहन करणारे जिल्हा प्रशासन प्रत्यक्षात कडक आंमल बजाणी करीत नाही. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी तसेच नियमाचे पालन करुन घेण्यासाठी तयार करण्यात आलेले पथक कुठे गायब होतात दिसतंच नाहीत. एखाद्या वेळेस अचानक कुठेतरी रस्त्यावर घोळक्याने कारवाई करतांना दिसतात. विशेष म्हणजे पथकाच्या शेजारीच दुकानदार आणि इतर व्यवसायीक विना मास्क काम करतांना दिसत असतांनाही पथक फक्त वाहनावर कारवाई करते.
पथकाला जर फक्त वाहनचालकावरच कारवाईचे आदेश असतील तर जिल्हा प्रशासनाने विना मास्क फिरणार्या सर्वच लोकांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. विशेष म्हणजे सर्वांवर कडक कारवाई झाली तरच कोरोनाला आळा बसेल नसता कोरोना वाढत जाईल आणि सर्वसामान्यांचे जिव धोक्यात येतील हे मात्र नक्की !
शासकीय दालनातच कार्यक्रम
कोरोनाच्या भितीमुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यक्रमावर बंदी असतांना देखील शासकीय दालनातच कार्यक्रम मोठ्या दणक्यात होत आहेत. प्रशसनातील अधिकारी आणि कर्मचारीच असे करु लागले तर सर्वसामान्यांना दोष देऊन काय फायदा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता ज्या सरकारी अधिकार्यांनी कार्यक्रम घेतले व ज्यांनी कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवले त्यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार? की, कोरोनाचा नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे?
भाजीपाला, फळ विके्रत्यासह अनेक दुकानदार विनामास्क करतात व्यवहार
शहरातील मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारला तर भाजीपाला, फळ विक्रेते, कापड दुकानदार, स्वीटमार्ट, हॉटेल, पाणीपुरी ठेले यासह अनेक व्यवसायीक तोंडाला मास्क न लावता व्यवहार करीत असल्याचे दिसून येत आहे. जनू कोरोना आपल्याला होत नाही आणि आपल्यापासून दुसर्यालाही होत नाही असाच अविर्भाव त्यांच्यात दिसून येतो. त्यामुळे यांच्यावर कावाई करणार की नाही हे प्रशासनाने स्पष्ट करावे.
चहाचे ग्लासचा सर्रास वापर
जसा काय कोरोना महाराष्ट्र सोडून गेला आहे. जालन्यात तर कोरोनाचे अस्थित्वच संपुष्टात आले आहे असे समजून बिंधास्तपणे वागतांना पहायला मिळत आहे. युज अॅन्ड थ्रो ग्लासचा वापर करुन कोरोना संसर्गापासून बचाव करणे आवश्यक असतांना हॉटेल चालक काचेच्या ग्लासमधूनच सर्रासपणे चहा देत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकच काचेचा ग्लास शेकडो लोकांच्या तोंडाला लावला जात आहे. विशेष म्हणजे एकाच बादलीतल्या पाण्यात सर्व ग्लास धुतले जात असल्याचेही पहायला मिळाले. त्यामुळे या हॉटेलमालकावर अंकुश ठेवणे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास कारणीभुत ठरणार्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी होत आहे.
गुटखा, तंबाखुची सर्वास विक्री
जिल्ह्यात गुटखा बंदी असल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी बेकायदेशीर गुटखा सर्रासपणे विक्री सुरु आहे. चौका चौकात आणि बैठकीच्या ठिकाणी पिचकार्या मारणारे तसेच दुकानाबाहेर बसून पिचकार्या मारणारे पहायला मिळत आहे. काही दुकानासमोर तर गुटख्याच्या रंगाने परिसर रंगला आहे. ज्यांच्या दुकानासमोर गुटख्याच्या पिचकार्या मारलेल्या दिसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली तरच त्यांच्या समोर गुटखा खाणार्याला बसू दिले जाणार नाही अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास त्यांचाही मोठा सहभाग असेल. या प्रकाराकडे अन्न व औषधी प्रशासनासह पोलीस प्रशासनने आणि भरारी पथकांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
Leave a Reply